Gelatin Sticks Found Near School in Uttarakhand : उत्तराखंड पोलिसांनी अल्मोरा (Almora) येथील एका सरकारी शाळेच्या परिसरातून 161 जिलेटिनच्या कांड्या (Gelatin Sticks) जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात शक्तिशाली स्फोटके (Explosives) आढळून आल्यामुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक (Security Tightened) करण्यात आली आहे. या परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. सरकारी उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी, मुलांना खेळताना जवळच्या झुडपांमध्ये (Bushes) एक संशयास्पद वस्तू (Suspicious Object) दिसल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी ही घटना समोर आली.
माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तो परिसर सील केला. बॉम्ब निकामी करणारे पथक (Bomb Disposal Squad – BDS) आणि श्वान पथकाने कसून शोध घेऊन स्फोटके जप्त केली आणि घटनास्थळावरून नमुने गोळा केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यांच्या बांधकामावेळी दगड फोडण्यासाठी जिलेटिन कांड्यांचा वापर केला जातो. अल्मोराचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) देवेंद्र पिंचा यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, इंडियन एक्सप्लोझिव्ह ॲक्ट (Indian Explosive Act) अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अधिक शोध सुरू आहे. पिंचा यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, तपास पूर्ण झाल्यावर योग्य माहिती दिली जाईल असे स्पष्ट केले.
अल्मोरा पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी चार पथके (Four Teams) तयार केली आहेत. ही स्फोटक सामग्री शाळेजवळ कोणी आणि कशासाठी ठेवली, याचा शोध तपासकर्ते घेत आहेत. अलीकडेच, 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ला (Red Fort) परिसरात झालेल्या स्फोटात 15 जणांचा मृत्यू झाला होता, तर त्याआधी फरीदाबाद येथील अल फलाह विद्यापीठाजवळ 2900 किलो स्फोटके जप्त करण्यात आली होती. देशभरातील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर (High Alert) असताना, एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याने सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे.
हेही वाचा – Flight Ticket Cancellation: सरकारचं मोठं पाऊल ! शेवटच्या क्षणी विमानाचे तिकीट रद्द केल्यास मिळणार 80% रिफंड?