Dabur Products Ban: डाबरच्या अनेक उत्पादनांवर FSSAI ची बंदी; मोठं कारण आलं समोर

देशातील नामांकित एफएमसीजी (FMCG) कंपनी 'डाबर इंडिया'च्या अनेक लोकप्रिय अन्नपदार्थांच्या विक्रीला तडकाफडकी स्थगिती देण्यात आली आहे.

Dabur Products Ban: डाबरच्या अनेक उत्पादनांवर FSSAI ची बंदी; मोठं कारण आलं समोर

Dabur Products Ban: '100 टक्के नैसर्गिक' , '100 टक्के शुद्ध' अशा दाव्यांचा वापर करून ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या कंपन्यांविरोधात अन्न सुरक्षा नियामकाने (FSSAI) कडक पावले उचलली आहेत. याअंतर्गत देशातील नामांकित एफएमसीजी (FMCG) कंपनी 'डाबर इंडिया'च्या अनेक लोकप्रिय अन्नपदार्थांच्या विक्रीला तडकाफडकी स्थगिती देण्यात आली आहे. या कारवाईचा थेट परिणाम शेअर बाजारावर झाला असून मंगळवारी डाबरच्या शेअर्समध्ये 2.42 टक्क्यांची घसरण झाली आणि तो 415.50 रुपयांपर्यंत खाली आला.

कोणकोणत्या उत्पादनांना लागला ब्रेक?

एफएसएसएआयच्या (FSSAI) या दणक्यामुळे डाबरच्या दैनंदिन वापरातील प्रमुख उत्पादनांच्या विक्रीवर रोख लावण्यात आली आहे. यात डाबरचा मध (Honey), गाईचे तूप (Cow Ghee), ॲपल सायडर व्हिनेगर, व्हर्जिन नारळ तेल, तीळ तेल, डाबरचे नारळ पाणी आणि होममेड कोकोनट मिल्क (नारळाचे दूध) यांसारख्या पॅकेज्ड वस्तूंचा समावेश आहे.

एफएसएसएआयच्या कारवाईचे नेमके कारण काय?
अन्न सुरक्षा नियमांनुसार (FSS नियम, 2018) कोणत्याही उत्पादनावर "100 टक्के शुद्ध" किंवा "100 टक्केनॅचरल" असे लेबल लावणे हे अपूर्ण, अस्पष्ट आणि ग्राहकांची दिशाभूल करणारे मानले जाते. तपासात असे उघडकीस आले की, डाबरने वैध 'ऑरगॅनिक प्रमाणपत्र' नसतानाही काही व्हिनेगर आणि मधाच्या बॉटलवर "जैविक भारत" (Organic India) चा लोगो वापरला होता. तसेच मिश्रित घटकांपासून बनलेल्या 'कोकोनट मिल्क'वर देखील "100 टक्के शुद्ध" असा दावा केला जात होता, ज्यास कायद्यानुसार मनाई आहे.

नोटीसकडे दुर्लक्ष; 15 दिवसांत मागितला अहवाल
नियामकाने स्पष्ट केले की, डाबरला अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती मागे घेण्यासाठी यापूर्वीच सूचित करण्यात आले होते. परंतु, कंपनीकडून कोणतीही समाधानकारक सुधारणा झाली नाही. त्यामुळे अखेर FSSAI ने कारवाईचा बडगा उगारत कंपनीला पुढील 15 दिवसांच्या आत 'ॲक्शन टेकन रिपोर्ट' (ATR) सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यावर डाबरने नोटीस मिळाल्याची कबुली दिली असून, नियमांनुसार लेबल्स आणि वेबसाईटवर बदल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा – India Bans Alcohol Brand : ऐन गटारीच्या तोंडावर मद्यप्रेमींना धक्का! रम आणि व्हिस्कीच्या 'या' ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI चा निर्णय

इतर ब्रँड्सवरही एफएसएसएआयची नजर
FSSAI ने केवळ डाबरच नव्हे, तर संपूर्ण पॅकेज्ड फूड क्षेत्रातील दाव्यांवर कडक लक्ष ठेवले आहे. यापूर्वी एफएसएसएआयच्या इशाऱ्यानंतर 'पेप्सिको इंडिया'ने त्यांच्या 'स्टिंग' (Sting) या पेयावरून 'एनर्जी' हा शब्द हटवला होता, तर ज्यूस उत्पादकांनाही त्यांच्या पॅकवरून '100 टक्के फ्रूट ज्यूस' असा दावा हटवण्याचे आदेश देण्यात आले होते. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number