India New Zealand FTA: भारत-न्यूझीलंडमध्ये मुक्त व्यापार करार; कीवी, सफरचंदासह ‘या’ वस्तू होणार स्वस्त

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांदरम्यान झालेला ऐतिहासिक मुक्त व्यापार करार (FTA) येत्या 20 ऑक्टोबरपासून अधिकृतपणे अमलात येणार आहे.

India New Zealand FTA: भारत-न्यूझीलंडमध्ये मुक्त व्यापार करार; कीवी, सफरचंदासह ‘या’ वस्तू होणार स्वस्त

India New Zealand FTA: येत्या आगामी सणासुदीच्या काळात भारतीय ग्राहकांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांदरम्यान झालेला ऐतिहासिक मुक्त व्यापार करार (FTA) येत्या 20 ऑक्टोबरपासून अधिकृतपणे अमलात येणार आहे. या व्यापार कराराच्या अंमलबजावणीमुळे न्यूझीलंडवरून भारतात आयात होणाऱ्या अनेक विदेशी फळांसह लक्झरी उत्पादनांवरील कस्टम ड्युटी म्हणजेच आयात कर टप्प्याटप्प्याने कमी केला जाणार आहे. परिणामी भारतीय बाजारपेठेत कीवी, सफरचंद, अ‍ॅव्होकॅडो, चेरी, ब्लूबेरी, सीफूड तसेच प्रीमियम दर्जाची वाईन आणि दारू अधिक परवडणाऱ्या दरांत उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुढील 10 वर्षांत आयात शुल्कात 25 ते 50 टक्क्यांपर्यंत घट 

सध्या भारतात परदेशी वाईन आणि मद्यावर मोठ्या प्रमाणात आयात कर आकारला जातो. मात्र नव्या एफटीए धोरणानुसार, न्यूझीलंडमधून येणाऱ्या वाईनच्या मूळ किमतीच्या आधारावर पुढील 10 वर्षांच्या कालावधीत शुल्कात 25 टक्के ते 50 टक्क्यांपर्यंत कपात करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही सवलत एकदम न मिळता टप्प्याटप्प्याने लागू केली जाईल. या व्यतिरिक्त दुग्धजन्य पदार्थांवर लागणारे करही शिथिल होणार असल्याने भारतीय ग्राहकांना जागतिक दर्जाची उत्पादने कमी किमतीत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन्ही देशांमधील हा व्यापार करार द्विपक्षीय आर्थिक संबंधांना अधिक बळकट करणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – Greenland Agreement: ग्रीनलँडच्या सार्वभौमत्वाला मान्यता; ताबा डेन्मार्ककडेच पण अमेरिकेचे सैन्य तैनात राहणार; ट्रम्प यांची माघार की कूटनीतिक विजय?

भारतीय औषधनिर्माण आणि वस्त्रोद्योगाला न्यूझीलंडमध्ये शून्य शुल्काने थेट प्रवेश

या कराराचा फायदा केवळ आयातीपुरता मर्यादित नसून भारतीय निर्यातदारांनाही याचा प्रचंड मोठा आर्थिक लाभ होणार आहे. भारतातील वस्त्रोद्योग, औषधनिर्माण (फार्म्युटिकल्स), आयटी सेवा आणि अभियांत्रिकी उत्पादनांना आता न्यूझीलंडच्या बाजारपेठेत विनाशुल्क अथवा नगण्य करात थेट प्रवेश मिळणार आहे. यामुळे भारतीय व्यावसायिकांना नवीन आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल आणि देशाच्या निर्यातीत मोठी वाढ नोंदवली जाईल. दोन्ही देशांच्या आयात-निर्यात क्षेत्राला यामुळे मोठी उभारी मिळणार असून सणासुदीच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला या निर्णयाचा मोठा पाठबळ मिळेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number