Cough Syrup: राजस्थानमध्ये खोकल्याच्या सिरपमुळे 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, तर भरतपूरमध्ये एक चिमुरडा व्हेंटिलेटरवर

हे सिरप प्यायल्याने 5 वर्षांच्या मुलाचा रात्री झोपेतच मृत्यू झाला. ताबडतोब त्याला सीकर येथील एसके रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Cough Syrup: राजस्थानमध्ये खोकल्याच्या सिरपमुळे 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, तर भरतपूरमध्ये एक चिमुरडा व्हेंटिलेटरवर

Cough Syrup: राजस्थानमधील सिकर जिल्ह्यातील खोरी ब्राह्मणन गावात मोफत औषध योजनेअंतर्गत मुलांना खोकल्याच्या सिरपचे वितरण करण्यात आले. मात्र हे सिरप प्यायल्याने 5 वर्षांच्या मुलाचा रात्री झोपेतच मृत्यू झाला. ताबडतोब त्याला सीकर येथील एसके रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टम अहवालातून समोर येईल. 

हेही वाचा – Kidney Infection: मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात किडनी संसर्गाची विचित्र लाट; 22 दिवसांत सात मुलांचा मृत्यू

भरतपूरमध्ये 3 वर्षीय मुलगा व्हेंटिलेटरवर 

मृत मुलाचे काका बसंत शर्मा यांनी सांगितले की, रात्री सर्व काही सामान्य होते, पण पहाटे 3:30 वाजता मुलाला उचकी येऊ लागल्या. आईने त्याला पाणी दिले, मात्र तो उठला नाही. याच सिरपमुळे भरतपूर जिल्ह्यातील एक 3 वर्षीय मुलगा गगन गंभीर अवस्थेत आहे. कलसाडा गावातील मुलाची तब्येत बिघडल्यावर त्याला जयपूरमधील जेके लोन रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तो व्हेंटिलेटरवर आहे. डॉक्टरांच्या अहवालानुसार, मुलगा बेशुद्ध पडला आणि हृदयाचे ठोके अनियंत्रित झाले.

हेही वाचा – Hardik Pandya Injury: हार्दिक पांड्याच्या दुखापतीने भारतीय संघ चिंतेत; ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकण्याची शक्यता

दरम्यान, हे सिरप घेतल्याने सामुदायिक आरोग्य केंद्राचे प्रभारी डॉ. ताराचंद योगी देखील आजारी पडले. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जोगेंद्र गुर्जर यांनी सांगितले की, सिरपच्या एका बॅचमध्ये तांत्रिक दोष असल्याचा संशय आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये या बॅचचे वितरण तात्काळ थांबवण्यात आले आहे. तथापी, राज्य सरकारने सिरपच्या वापरावर तातडीची बंदी घालून तपासणीसाठी आदेश दिले आहेत. तसेच पुरवठादार कंपनीवरही जबाबदारी निश्चित करण्यासाठी चौकशी सुरु करण्यात आली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number