Sri Lanka Floods: श्रीलंकेला पूर व भूस्खलनाचा तडाखा ! 31 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

देशाच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राने (DMC) गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 31 नागरिकांचा मृत्यू झाला असून 4000 पेक्षा अधिक लोक प्रभावित झाले आहेत.

Sri Lanka Floods: श्रीलंकेला पूर व भूस्खलनाचा तडाखा ! 31 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

Sri Lanka Floods: श्रीलंका सततच्या जोरदार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. गेल्या अकरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे देशातील अनेक भाग पूरग्रस्त झाले असून भूस्खलनांच्या मालिकेमुळे मोठा जीवित आणि वित्तहानीचा सामना करावा लागत आहे. देशाच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राने (DMC) गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 31 नागरिकांचा मृत्यू झाला असून 4000 पेक्षा अधिक लोक प्रभावित झाले आहेत. तसेच अद्याप 14 लोक बेपत्ता आहेत.

हेही वाचा – Firing near White House : व्हाईट हाऊसजवळ गोळीबार! दोन 'नॅशनल गार्ड्स' गंभीर जखमी; थरारक प्रकार सुरू असताना ट्रम्प कुठे होते?

मध्यवर्ती पर्वतीय भागात मोठी हानी

अधिकृत आकडेवारीनुसार, मध्यवर्ती डोंगराळ पट्ट्यातच 18 मृत्यू नोंदवले गेले आहेत. कुंबुक्काना येथे वाढत्या पाण्यात एक प्रवासी बस अडकल्यानंतर मोठी दुर्घटना टळली. आपत्कालीन प्रतिसाद पथकांनी 23 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले, अशी माहिती डेली मिरर ऑनलाइनने दिली आहे. 

हेही वाचा – Radio Station Hack: भयंकर! आधी रेडिओ स्टेशन हॅक केलं…नंतर प्रसारित केली बनावट आपत्कालीन सूचना; 'या' देशात घडली धक्कादायक घटना

राष्ट्राध्यक्षांचा तातडीचा हस्तक्षेप

पावसाची परिस्थिती गंभीर होत असल्याने राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी तातडीची बैठक बोलावली. देशातील 25 पैकी 17 जिल्ह्यांमध्ये स्थिती अत्यंत बिकट असल्याचे त्यांनी सांगितले. हवामान विभागानुसार, दक्षिण–पूर्व भागात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होत आहे. सध्या हे प्रणाली बट्टीकलोआच्या आग्नेयेस 210 किमी अंतरावर सक्रिय आहे. हवामान विभागाने इशारा दिला आहे की ते पुढील 12 तासांत ‘खोल कमी दाबाचे क्षेत्र’ बनू शकते. देशातील काही भागांमध्ये 200 मिमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number