Deool Band 2 First Poster: ‘देऊळ बंद 2’चं पहिलं पोस्टर रिलीज; दुचाकीवर स्वार झाले स्वामी, पोस्टरने वाढवली उत्सुकता

'देऊळ बंद'चा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या आठवड्यात प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर, आज चित्रपटाचे पहिले पोस्टर अधिकृतपणे प्रदर्शित करण्यात आले.

Deool Band 2 First Poster: ‘देऊळ बंद 2’चं पहिलं पोस्टर रिलीज; दुचाकीवर स्वार झाले स्वामी, पोस्टरने वाढवली उत्सुकता

Deool Band 2 First Poster: मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत गाजलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘देऊळ बंद’चा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या आठवड्यात प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर, आज चित्रपटाचे पहिले पोस्टर अधिकृतपणे प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमध्ये स्वामी समर्थांचा एक वेगळा आणि अनोखा अंदाज पाहायला मिळत असून, सोशल मीडियावर सध्या या पोस्टरचीच चर्चा रंगली आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर आता या दुसऱ्या भागाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

पोस्टरमधील ‘तो’ विशेष प्रवास: आलिशान कार ते सामान्य दुचाकी
‘देऊळ बंद’च्या पहिल्या भागात स्वामी समर्थ एका आलिशान चारचाकीतून शास्त्रज्ञासोबत प्रवास करताना दिसले होते. मात्र, ‘देऊळ बंद 2 – आता परीक्षा देवाची’ या भागाच्या पोस्टरमध्ये स्वामी एका सामान्य महिलेच्या दुचाकीवर मागे बसलेले दिसत आहेत. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी पहिल्या भागात आपल्या कसदार अभिनयाने स्वामी समर्थांचे रूप साक्षात उभे केले होते, याही भागात तेच स्वामींच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अभिनेत्री स्नेहल तरडे दुचाकी चालवताना दिसत असून, त्यांच्या डोळ्यांत अश्रू आणि चेहऱ्यावर संताप आहे, तर स्वामींच्या चेहऱ्यावर मात्र प्रसन्न हास्य आहे. संकटात सापडलेल्या भक्ताच्या पाठीशी स्वामी कसे खंबीरपणे उभे राहतात, याचेच दर्शन या पोस्टरमधून घडते.

एका सामान्य कुटुंबाची असामान्य कथा
एका गरीब महिलेच्या जुन्या दुचाकीवरून स्वामींचा हा प्रवास बरंच काही सांगून जातो. एका सामान्य कुटुंबाच्या आयुष्यातील संघर्ष आणि त्या संघर्षात स्वामींची कृपा कशी बरसते, याचे प्रभावी चित्रण या चित्रपटात असणार असल्याची शक्यता पोस्टरवरून वर्तवली जात आहे. “आता परीक्षा देवाची” ही टॅगलाईन चित्रपटाच्या कथानकाबाबत अधिक कुतूहल निर्माण करणारी ठरत आहे.

हेही वाचा – Raja Shivaji Song Out: स्वराज्याचा हुंकार! ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील ‘छत्रपती’ गाणं रिलीज; अजय-अतुलच्या सुराने अंगावर येईल शहारा

दिग्दर्शन, निर्मिती आणि प्रदर्शनाची तारीख
वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाची धुरा पुन्हा एकदा अष्टपैलू कलाकार प्रविण विठ्ठल तरडे यांनी सांभाळली आहे. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशा सर्वच आघाड्यांवर प्रविण तरडे यांची छाप पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती कैलाश वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी यांनी केली आहे. स्वामी भक्तांसाठी खास पर्वणी असलेला हा चित्रपट येत्या 21 मे 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number