Actress Tragic Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचा वयाच्या 30 व्या वर्षी संशयास्पद मृत्यू; चाहत्यांना मोठा धक्का

राहत्या घरी चक्कर येऊन पडल्याने त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, मात्र...

Actress Tragic Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचा वयाच्या 30 व्या वर्षी संशयास्पद मृत्यू; चाहत्यांना मोठा धक्का

Actress Tragic Death: संगीत आणि मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका सिरोही यांचे मंगळवारी रात्री उशिरा अकाली निधन झाले. त्या अवघ्या 30 वर्षांच्या होत्या. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील राहत्या घरी चक्कर येऊन पडल्याने त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी अभिनेत्रीला मृत घोषित केले. अभिनेत्रीच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

गाझियाबादमध्ये पार पडले अंत्यसंस्कार
दिव्यांका सिरोही यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी गाझियाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हरियाणवी चित्रपटसृष्टीतील नामांकित निर्माते जीतू, कलाकार विकास आणि अनेक सहकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत या कठीण प्रसंगात त्यांना आधार दिला. दिव्यांका यांच्या निधनामुळे एका उमद्या कलाकाराला गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

50 हून अधिक सुपरहिट गाणी आणि मोठा चाहता वर्ग
दिव्यांका सिरोही यांनी आपल्या छोट्याशा कारकिर्दीत हरियाणवी अल्बम क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी मासूम शर्मा, अमित सैनी रोहतकिया आणि केडी यांसारख्या दिग्गज गायकांसोबत 50 हून अधिक सुपरहिट गाण्यांमध्ये काम केले होते. सोशल मीडियावर त्यांची लोकप्रियता प्रचंड होती. इंस्टाग्रामवर तिचे 13 लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स होते. त्यांच्या जाण्याने हरियाणवी उद्योगात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

हेही वाचा – Asha Bhosle Death: 'आता आजीच्या आत्म्याला शांती लाभेल…'; नात जनाईने पूर्ण केली आजी आशा भोसलेंची शेवटची इच्छा

चाहत्यांकडून सोशल मीडियावर श्रद्धांजलीचा ओघ
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिव्यांका यांचे चाहते आणि सहकारी कलाकार अश्रूपूर्ण नयनांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. त्यांच्या गाण्यांमधील ऊर्जेमुळे त्या तरुणाईमध्ये अत्यंत लोकप्रिय होत्या. अवघ्या 30 व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्यामुळे त्यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली जात असून, त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाचे स्मरण केले जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number