Bigg Boss 20 Promo Out : ‘जो करण-अर्जुन में हुआ, वो दोबारा होगा…’; सलमानच्या बिग बॉस 20 चा धमाकेदार प्रोमो रिलीज, तारीखही ठरली

भारतीय टीव्ही जगताच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच महिन्यात 7 वेगवेगळ्या भाषांमधील सीझन्स भेटीस येत असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Bigg Boss 20 Promo Out : ‘जो करण-अर्जुन में हुआ, वो दोबारा होगा…’; सलमानच्या बिग बॉस 20 चा धमाकेदार प्रोमो रिलीज, तारीखही ठरली

Bigg Boss 20 Promo Out : छोटे पडदे गाजवण्यासाठी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ‘बिग बॉस’चा नवा सीझन सज्ज झाला आहे. भारतीय टीव्ही जगताच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच महिन्यात 7 वेगवेगळ्या भाषांमधील सीझन्स भेटीस येत असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यात सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती हिंदीतील ‘बिग बॉस 20’ची, कारण या लोकप्रिय रियालिटी शोला आता तब्बल 20 वर्षे पूर्ण होत आहेत. याच निमित्ताने निर्मात्यांनी अखेर शोची अधिकृत घोषणा करत पहिल्या प्रोमोद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

“जो करण अर्जुन में हुआ…”; प्रोमोमधील सलमानच्या संवादाने वाढवली उत्सुकता
नुकत्याच समोर आलेल्या टीझरमध्ये बॉलिवूडचा ‘भाईजान’ म्हणजेच सलमान खानची एक वेगळीच झलक पाहायला मिळत आहे. आपल्या आयकॉनिक ‘करण अर्जुन’ चित्रपटातील अवताराची आठवण करून देत, घोड्यावरून येणाऱ्या सलमानने “जो करण अर्जुन में हुआ, वो दोबारा होगा… तथास्तु!” असा रोमहर्षक संवाद साधला आहे. या संवादाने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला असून शोमध्ये नक्की काय नवा ट्विस्ट असणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सीझन असणार अतिशय खास; सलमानने दिला महत्त्वाचा इशारा
या आगामी पर्वाबद्दल भाष्य करताना सलमान खानने सांगितले की, ‘बिग बॉस’चे प्रत्येक वर्ष नवीन समीकरणे आणि अनपेक्षित वळणे घेऊन येते; मात्र 20 वे पर्व आजवरच्या सर्व सीझन्सपेक्षा पूर्णपणे वेगळे आणि भव्य असेल. प्रोमोमध्येच एक मोठा संकेत दडलेला असून प्रेक्षकांनी तो लक्षपूर्वक पाहण्याचे आवाहनही त्याने केले आहे. सध्यातरी हा फक्त 1 ला टीझर असून खरी उत्सुकता अजून बाकी असल्याचे सलमानने स्पष्ट केले.

कधी आणि कुठे पाहता येणार? प्रीमिअरची वेळ झाली निश्चित
शोच्या प्रसारणाची तारीख आणि वेळ आता स्पष्ट झाली आहे. आगामी 6 सप्टेंबरपासून ‘बिग बॉस 20’चा थरार सुरू होणार आहे. डिजिटल प्रेक्षक जिओहॉटस्टारवर दररोज रात्री 9 वाजता हा शो पाहू शकतील, तर दूरचित्रवाणीवर ‘कलर्स टीव्ही’ वाहिनीवर रात्री 10:30 वाजता त्याचे प्रसारण केले जाईल. यामुळे ओटीटी आणि टीव्ही अशा दोन्ही माध्यमांवरील चाहत्यांना या शोचा आनंद घेता येणार आहे.

‘या’ प्रसिद्ध चेहऱ्यांची नावे चर्चेत; एकाच वेळी 6 भाषांमध्ये धुरळा!
यंदाच्या पर्वात सहभागी होणाऱ्या संभाव्य स्पर्धकांविषयी विविध चर्चांना उधाण आले आहे. जन्नत जुबैर, उर्फी जावेद, फैझल शेख (मिस्टर फैसू), अंजली अरोरा, कुशल तंवर, रुरू ठाकूर, सैंटी शर्मा आणि रिधिमा गुप्ता यांसारख्या प्रसिद्ध टीव्ही कलाकार व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सशी संपर्क साधल्याचे समजते. मात्र, आयोजकांकडून अद्याप कोणत्याही नावावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही.

हेही वाचा – Raja Dasharatha In Ramayana Movie: ‘रामायण’मध्ये राजा दशरथाच्या भूमिकेसाठी अजिंक्य देव होते पहिली पसंती; ऐनवेळी मिळाली या हिंदी अभिनेत्याला संधी

दरम्यान, यंदाचा सीझन हिंदीसह देशातील एकूण 6 प्रादेशिक भाषांमध्ये एकाच वेळी सुरू होत आहे. हिंदीचे सूत्रसंचालन सलमान खान करणार असून तमिळमध्ये विजय सेतूपती, तेलुगुमध्ये नागार्जुन, कन्नडमध्ये किच्चा सुदीप तर मल्याळममध्ये मोहनलाल ही कमान सांभाळतील. विशेष म्हणजे, बंगाली ‘बिग बॉस’च्या सूत्रसंचालकाची धुरा भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली पहिल्यांदाच सांभाळताना दिसणार आहे.  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number