Explosion in Indonesia Mosque: इंडोनेशियात मशिदीत प्रार्थनेदरम्यान स्फोट; 50 हून अधिक जण जखमी

हा स्फोट केलापा गडिंग परिसरातील स्टेट सीनियर हायस्कूल 72 मधील मशिदीत झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की मशिदीचा काही भाग उद्ध्वस्त झाला आणि परिसरात गोंधळ उडाला.<br/>

Explosion in Indonesia Mosque: इंडोनेशियात मशिदीत प्रार्थनेदरम्यान स्फोट; 50 हून अधिक जण जखमी

Explosion in Indonesia Mosque: इंडोनेशियाच्या राजधानी जकार्ता येथे शुक्रवारी दुपारी प्रार्थनेदरम्यान मोठा स्फोट झाला असून, या घटनेत 50 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. हा स्फोट केलापा गडिंग परिसरातील स्टेट सीनियर हायस्कूल 72 मधील मशिदीत झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की मशिदीचा काही भाग उद्ध्वस्त झाला आणि परिसरात गोंधळ उडाला. दरम्यान, सुमारे 12:30 वाजता शुक्रवारीची प्रार्थना सुरू असताना मशिदीच्या मुख्य हॉलच्या मागून अचानक मोठा स्फोट झाला. प्रत्यक्षदर्शी शिक्षक बुडी लक्सोनो यांनी सांगितले की, प्रार्थना सुरू असतानाच अचानक मोठा आवाज झाला. काही क्षणांत धुराचे लोट उठले आणि विद्यार्थी रडत-ओरडत बाहेर पळू लागले.

जखमींवर उपचार सुरू 

या स्फोटात 15 विद्यार्थी आणि 5 शिक्षक गंभीर जखमी झाले असून, बहुतेकांना काचेच्या तुकड्यांमुळे किंवा आवाजाच्या तीव्रतेमुळे दुखापत झाली आहे. सर्वांना जवळच्या केलापा गडिंग क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा – Climate Change Investment: हवामान बदलासोबत लढण्यासाठी जागतिक अर्थव्यवस्थांना मोठा खर्च; भारतासह नऊ अर्थव्यवस्था नोंदवणार सहभाग

नौदल आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी

शाळा नौदलाच्या कंपाऊंडमध्ये असल्याने, स्फोटानंतर तात्काळ नेव्ही पर्सनल आणि जकार्ता पोलीस घटनास्थळी पोहोचले. परिसर बंद करण्यात आला असून, बॉम्ब शोध पथकाने संपूर्ण परिसराची तपासणी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. हा स्फोट विद्युत बिघाड किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणातील दोषामुळे झाला असण्याची शक्यता आहे. तथापि, तपासादरम्यान काही संशयास्पद वस्तू सापडल्या आहेत, ज्यात घरगुती बॉम्बचे भाग, रिमोट कंट्रोल, एअरसॉफ्ट गन आणि रिव्हॉल्व्हरसारखे शस्त्र यांचा समावेश आहे.

हेही वाचा – Donald Trump यांचा नवा दावा; ‘भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवली!’ म्हणाले, ‘मोदी एक महान व्यक्ती’

पोलिसांकडून तपास सुरू 

या प्रकरणाचा तपास फॉरेन्सिक आणि बॉम्ब निकामी पथक करत आहे. पोलिसांनी शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले असून, परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, घटनेचे मूळ कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. निष्कर्षावर पोहोचण्याआधी सर्व तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुरावे तपासले जातील. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number