POCSO Act Case: मनोरंजन विश्व हादरलं! प्रसिद्ध अभिनेत्याला अटक; 16 वर्षीय मुलीचा छळ केल्याचा आरोप

पूर्व उपनगरात राहणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणे, तिला फोन करून त्रास देणे आणि तिच्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

POCSO Act Case: मनोरंजन विश्व हादरलं! प्रसिद्ध अभिनेत्याला अटक; 16 वर्षीय मुलीचा छळ केल्याचा आरोप

POCSO Act Case: 'सैराब' या टीव्ही मालिकेतून घराघरात पोहोचलेला प्रसिद्ध अभिनेता रोहित चंदेल हा सध्या गंभीर कायदेशीर अडचणीत सापडला आहे. पूर्व उपनगरात राहणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणे, तिला फोन करून त्रास देणे आणि तिच्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पंत नगर पोलिसांनी रोहित चंदेलविरुद्ध 'प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्सेस' (POCSO) या कडक कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला आहे.

पंत नगर पोलिसांची धडक कारवाई; आरोपीला पोलीस कोठडी

'पांड्या स्टोअर' आणि 'काशीबाई बाजीराव बल्लाळ' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या या 29 वर्षीय अभिनेत्याला शुक्रवारी दहिसर येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याच्यावर BNS च्या कलम 78 (पाठलाग करणे) आणि 115(2) (इच्छेने दुखापत पोहोचवणे) अंतर्गत कारवाई केली आहे. अटक केल्यानंतर रोहित चंदेलला विशेष पोक्सो न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा – Om Bhutkar Wedding: 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भुतकर अडकला लग्नबंधनात? सोशल मीडियावर नवरदेवाच्या वेषातील फोटो व्हायरल

पीडितेचा पाठलाग करून इमारतीजवळ घातला वाद
पूर्व उपनगरातील एका रहिवाशाने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, आरोपी रोहित हा पीडित मुलीला वेगवेगळ्या क्रमांकांवरून फोन करून सतत मानसिक त्रास देत होता. धक्कादायक बाब म्हणजे, 5 जुलै रोजी त्याने या अल्पवयीन मुलीला तिच्याच इमारतीजवळ अडवून तिचा पाठलाग केला, तिच्याशी वाद घातला आणि जाहीरपणे शिवीगाळ करत तिच्यावर हल्ला केला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांना आधीपासून ओळखत होते. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला गजाआड केले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number