Spicejet Emergency Landing: हवेत इंजिन फेल, आगीच्या ठिणग्या अन् प्रवाशांचा आक्रोश…दिल्ली विमानतळावर ‘स्पाइसजेट’चे थरारक लँडिंग

विमानाचे एक इंजिन निकामी होऊन त्यातून आगीच्या ठिणग्या पडू लागल्याने प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखत 'मे-डे' कॉल केला आणि 150 प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले.

Spicejet Emergency Landing: हवेत इंजिन फेल, आगीच्या ठिणग्या अन् प्रवाशांचा आक्रोश…दिल्ली विमानतळावर ‘स्पाइसजेट’चे थरारक लँडिंग

Spicejet Emergency Landing:  दिल्लीहून लेहच्या दिशेने झेपावलेल्या स्पाइसजेटच्या (SG 121) विमानात हवेतच भीषण तांत्रिक बिघाड झाल्याची खळबळजनक घटना घडली. विमानाचे एक इंजिन निकामी होऊन त्यातून आगीच्या ठिणग्या पडू लागल्याने प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखत 'मे-डे' (May Day) कॉल केला आणि 150 प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले.

नेमकी घटना काय?
बोईंग 737 विमानाने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच ही घटना घडली. विमानाच्या दुसऱ्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे क्रू मेंबर्सच्या लक्षात आले. विमानाने उंची गाठण्यापूर्वीच प्रवाशांना खिडकीतून आगीच्या ज्वाळा दिसू लागल्याने विमानात रडारड सुरू झाली.

हेही वाचा – Helicopter Crash: भयंकर ! बघता बघता समुद्रातच कोसळलं हेलिकॉप्टर ; 7 जणांचा…

पायलटचा 'मे-डे' कॉल आणि आणीबाणी
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून वैमानिकाने तातडीने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (ATC) संपर्क साधला आणि 'मे-डे' (जीवावर बेतलेली आणीबाणी) संदेश पाठवला. विमानतळावर तत्काळ रेड अलर्ट जारी करण्यात आला. रनवेवर अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या. अखेर, मोठ्या कौशल्याने वैमानिकाने विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number