Elon Musk Trillionaire: उद्योगपती एलॉन मस्क याने जागतिक अर्थविश्वात एक नवा इतिहास रचला आहे. मस्कच्या संपत्तीत सातत्याने होणाऱ्या अफाट वाढीमुळे त्याने आता 'ट्रिलिनिअर' (अब्जाधीशांच्याही पुढचा टप्पा) क्लबमध्ये प्रवेश केला असून, हा बहुमान मिळवणारा तो जगातील एकमेव व्यक्ती ठरला आहे. गुरुवारी अवघ्या एका दिवसात मस्कच्या संपत्तीत तब्बल 45 अब्ज डॉलरची (अंदाजे 4,32,680 कोटी रुपये) विक्रमी भर पडली. या ऐतिहासिक उसळीमुळे मस्कची एकूण नेटवर्थ आता 722 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
इतर अब्जाधीश शर्यतीत कित्येक मैल मागे
'ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्स'ने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, या वर्षात मस्कच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ नोंदवली गेली आहे. श्रीमंतांच्या जागतिक यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या लॅरी पेज यांची एकूण संपत्ती मस्कच्या तुलनेत निम्मी आहे. म्हणजेच मस्कची बरोबरी करण्यासाठी इतर गर्भश्रीमंतांना आपली संपत्ती दुप्पट करावी लागणार आहे.
'स्पेसएक्स'च्या आयपीओमुळे (IPO) संपत्तीत उधाण
मस्कच्या संपत्तीत झालेल्या या अफाट वाढीमागे त्याची अंतराळ संशोधन कंपनी 'स्पेसएक्स' (SpaceX) कारणीभूत आहे. रॉकेट निर्मिती आणि 'स्टारलिंक' सॅटेलाईट इंटरनेटसाठी प्रसिद्ध असलेली स्पेसएक्स कंपनी लवकरच अमेरिकन शेअर बाजारात आपला आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. वॉल स्ट्रीटच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता असून, बाजारात हा शेअर्स SPCX या कोडने सूचीबद्ध होऊ शकतो. यामुळे मस्कच्या संपत्तीचा आलेख आणखी उंचावणार असल्याचा अंदाज आहे.
अंबानी-अदानी मस्कच्या तुलनेत कुठे?
चालू वर्षात एलॉन मस्कच्या संपत्तीत एकट्या 103 अब्ज डॉलरची भर पडली आहे. भारतातील सर्वोच्च श्रीमंत उद्योजकांशी तुलना केल्यास मस्क यांच्यापेक्षा कित्येक पटीने पुढे निघून गेला आहे. सध्या भारतातील अव्वल उद्योगपती गौतम अदानी यांची नेटवर्थ जवळपास 108 अब्ज डॉलर, तर मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 88.10 अब्ज डॉलरच्या घरात आहे.
हेही वाचा – Gold-Silver Rate Today: सोनं झालं स्वस्त! पश्चिम आशियातील वाढता तणाव तरीही सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण
जागतिक श्रीमंतांची यादी:
एलॉन मस्क: 722 अब्ज डॉलर (प्रथम क्रमांक)
लॅरी पेज: 58.1 अब्ज डॉलर (द्वितीय क्रमांक)
सर्गेई ब्रिन: 53.7 अब्ज डॉलर (तृतीयांश क्रमांक)
याशिवाय मायकेल डेल, जेफ बेझोस, जेनसेन हुआंग, डेव्हिड सुन आणि झान तू यांसारख्या इतर जागतिक अब्जाधीशांच्या संपत्तीतही वाढ झाली असली, तरी एलॉन मस्कच्या विक्रमी घोडदौडीपुढे सर्वच जण सध्या पिछाडीवर आहेत.