निवडणूक आयोगाचा नवीन नियम! आता 15 दिवसांत नोंदवले जाणार मतदार यादीत नाव

आता मतदार यादीत नाव नोंदणीकृत झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत मतदाराचे नाव मतदार यादीत येईल. तसेच पंधरा दिवसांच्या आत मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) मिळेल.

निवडणूक आयोगाचा नवीन नियम! आता 15 दिवसांत नोंदवले जाणार मतदार यादीत नाव
Edited Image

नवी दिल्ली: नवीन मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) मतदान यादीबाबत एक नवीन नियम बनवला आहे. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, आता मतदार यादीत नाव नोंदणीकृत झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत मतदाराचे नाव मतदार यादीत येईल. मतदार यादीत नाव जोडण्यासाठी अर्ज केल्यानंतर केवळ 15 दिवसांच्या आत मतदाराचे नाव यादीत नोंदवण्यात येणार आहे. तसेच पंधरा दिवसांच्या आत मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) मिळेल. 

हेही वाचा – इंडिगो फ्लाइटमध्ये अडकले भूपेश बघेल! 30 मिनिटे दरवाजा न उघडल्याने उडाला गोंधळ

याशिवाय, मतदार कार्ड जलद पोहोचवण्यासाठी, निवडणूक आयोगाने एक नवीन मानक कार्यप्रणाली सुरू केली आहे, ज्यामुळे मतदान यादीत कोणत्याही सुधारणानंतर 15 दिवसांच्या आत मतदार कार्ड मतदारापर्यंत पोहोचवता येणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी मतदारांच्या सोयीसाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. 

हेही वाचा – 15 ऑगस्टपासून बदलणार फास्टॅगसंदर्भातील नियम! वर्षाच्या पाससाठी लागणार 'इतके' पैसे

SMS द्वारे समजणार मतदार कार्डचे स्टेटस- 

दरम्यान, मतदारांना त्यांच्या मतदार कार्डच्या स्टेटसबाबत प्रत्येक टप्प्यावर SMS द्वारे माहिती देण्यात येईल. तथापी, याबाबत निवडणूक आयोगाने ईसीआय नेट प्लॅटफॉर्मवर एक आयटी मॉड्यूल सादर केले आहे. निवडणूक आयोगाच्या या बदलामुळे लाखो मतदाराला मोठा फायदा होणार असून त्यांना लवकरात लवकर मतदार कार्ड मिळण्यास मदत होणार आहे.    

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number