Earthquake In Pakistan: दुष्काळात तेरावा महिना! पाकिस्तानला भूकंपाचे धक्के

पातिस्तानात सोमवारी 4.2 तीव्रतेचा भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (एनसीएस) सांगितले की, भूकंप दुपारी 4:05 वाजता झाला.

Earthquake In Pakistan: दुष्काळात तेरावा महिना! पाकिस्तानला भूकंपाचे धक्के
Edited Image

इस्लामबाद: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अतिशय तणावपूर्ण झाले आहेत. भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. तसेच भारताने या हल्ल्याचा बदला घेण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर पाकिस्तानची भलतीचं तारांबळ उडाली आहे. अशातचं आता पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पातिस्तानात सोमवारी 4.2 तीव्रतेचा भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (एनसीएस) सांगितले की, भूकंप दुपारी 4:05 वाजता झाला. भूकंपाच्या धक्क्यांच्या भीतीमुळे लोक घराबाहेर पडले. एनसीएसच्या मते, भूकंपाचे केंद्र 10 किलोमीटर खोलीवर होते. 

हेही वाचा – अमेरिका आणि भारत भूकंपाचे धक्के! 3 ते 5.4 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली तीव्रता

अफगाणिस्तानलाही भूकंपाचा धक्का – 

दरम्यान, नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने असेही म्हटले आहे की, पाकिस्तानसह सोमवारी अफगाणिस्तानातही 4.2 तीव्रतेचा भूकंप झाला. एनसीएसच्या मते, अफगाणिस्तानातील भूकंप 10 किलोमीटर खोलीवर झाला. यानंतरही भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता कायम आहे.

हेही वाचा – Earthquake in ChileArgentina: अर्जेंटिना आणि चिलीमध्ये जोरदार भूकंप; त्सुनामीचा इशारा जारी

पाकिस्तानला यापूर्वीही भूकंपाचा धक्का – 

याआधी 30 एप्रिल रोजीही पाकिस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता 4.4 इतकी मोजण्यात आली. या भूकंपाचे केंद्र पाकिस्तानच्या उत्तरेकडील भागात होते. या भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. परंतु, यामुळे पाक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number