FASTag नसलेल्या वाहनचालकांना मोठा दिलासा! आता दुप्पट नाही, फक्त एवढाच टोल भरा..

सध्या, ज्या वाहनांकडे वैध FASTag नाही, त्यांना रोख रकमेमध्ये (Cash) दुप्पट टोल भरावा लागतो. मात्र, आता नवीन पद्धतीमुळे त्यांचे पैसे काही प्रमाणात वाचतील.

FASTag नसलेल्या वाहनचालकांना मोठा दिलासा! आता दुप्पट नाही, फक्त एवढाच टोल भरा..

नवी दिल्ली : केंद्र सरकारने FASTag नसलेल्या किंवा खराब झालेल्या FASTag सह राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा दिला आहे. आता अशा वाहनचालकांना टोल प्लाझावर आतापर्यंत दुप्पट टोल (Double Toll Tax) भरावा लागत होता. तो आता लागणार नाही. सरकारने घोषणा केली आहे की, 15 नोव्हेंबर 2025 पासून, जर वाहनमालकांनी टोलचे पैसे UPI द्वारे भरले, तर त्यांना केवळ 1.25 पट टोल शुल्क भरावे लागेल. सध्या, ज्या वाहनांकडे वैध FASTag नाही, त्यांना रोख रकमेमध्ये (Cash) दुप्पट टोल भरावा लागतो. मात्र, डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा नवा नियम लागू केला आहे.

सरकारच्या निर्णयाचा उद्देश
केंद्र सरकारने National Highways Fee (Determination of Rates and Collection) Rules, 2008 मध्ये सुधारणा केली आहे. या बदलामागील मुख्य उद्देश महामार्गावरील रोख व्यवहार कमी करणे आणि डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणे हा आहे.
जुना नियम: वैध FASTag नसलेल्या वाहनाला रोखीत (Cash) टोल भरल्यास दुप्पट शुल्क भरावे लागेल.
नवीन नियम (15 नोव्हेंबरपासून): जर वाहनचालक UPI द्वारे पेमेंट करत असेल, तर त्याला फक्त 1.25 पट टोल भरावा लागेल.
या बदलामुळे टोल संकलन प्रणाली अधिक पारदर्शक आणि जलद बनेल, तसेच टोल प्लाझावर लागणाऱ्या लांबच लांब रांगांपासून वाहनचालकांना आराम मिळेल, असे सरकारचे म्हणणे आहे.

हेही वाचा – Jeevan Pramaan Patra: पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी! आता घरबसल्या जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार

वाहधारकांना किती फायदा होणार?
या नवीन नियमामुळे वाहनचालकांना होणारा फायदा एका उदाहरणावरून समजावून घेता येईल:
समजा, एका गाडीची सामान्य टोल टॅक्स 100 आहे. म्हणजेच, FASTag च्या माध्यमातून या टोलवरती 100 रुपये भरावे लागतात. याच ठिकाणी रोख स्वरूपात टोल भरायचा असल्यास 200 रुपये भरावे लागतील. पण हेच पेमेंट आता यूपीआयच्या (UPI) माध्यमातून केले तर 125 रुपये भरावे लागतील. म्हणजेच, रोख रकमेच्या तुलनेत 75 रुपये कमी लागतील. यामुळे काही कारणाने फास्टॅगच्या माध्यमातून टोल भरू न शकणाऱ्या वाहनचालकांचे पैसे यूपीआय पेमेंट केल्यास वाचू शकतील.
म्हणजेच, आता तुमच्याकडे FASTag नसला तरी, UPI पेमेंट करून तुम्ही सुमारे 75 रुपयांपर्यंत बचत करू शकता. हा निर्णय डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि टोलच्या रांगा कमी करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. हा नवा नियम 15 नोव्हेंबर 2025 पासून देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्ग टोल प्लाझावर लागू होईल.

हेही वाचा – Online Shopping : कॅश ऑन डिलिव्हरीवर (COD) 'एक्स्ट्रा चार्ज'ची द्यावा लागतोय? कंपनीवर होणार कारवाई

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number