Donald Trump Buffalo: ‘डोनाल्ड ट्रम्प’ म्हशीची कुर्बानी टळली; मालकाला मिळणार नुकसानभरपाई, काय आहे नेमकं प्रकरण? वाचा

बांगलादेशात 'ईद-उल-अधा' (बकरी ईद) सणाच्या पार्श्वभूमीवर या म्हशीची कुर्बानी देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एका विशेष आदेशान्वये या प्रक्रियेला स्थगिती दिली.

Donald Trump Buffalo: ‘डोनाल्ड ट्रम्प’ म्हशीची कुर्बानी टळली; मालकाला मिळणार नुकसानभरपाई, काय आहे नेमकं प्रकरण? वाचा

Donald Trump Buffalo: सोशल मीडियावर आपल्या आगळ्यावेगळ्या लूकमुळे प्रचंड व्हायरल झालेल्या 'डोनाल्ड ट्रम्प' नावाच्या म्हशीचा बळी देण्यास बांगलादेश प्रशासनाने कायदेशीर बंदी घातली आहे. बांगलादेशात 'ईद-उल-अधा' (बकरी ईद) सणाच्या पार्श्वभूमीवर या म्हशीची कुर्बानी देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एका विशेष आदेशान्वये या प्रक्रियेला स्थगिती दिली. इतकेच नव्हे तर, या दुर्मिळ म्हशीचे जतन करण्यासाठी तिला बांगलादेशची राजधानी ढाका येथील 'राष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात' (National Zoo) हलवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे.

'अल्बिनिझम' या दुर्मिळ आजारामुळे पडले 'डोनाल्ड ट्रम्प' नाव
ही म्हैस सोशल मीडियावर व्हायरल होण्यामागे तिची खास हेअरस्टाईल कारणीभूत ठरली आहे. या म्हशीचे सोनेरी रंगाचे, सळसळणारे केस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वैशिष्ट्यपूर्ण केसांच्या रचनेशी हुबेहूब मिळतीजुळती आहेत; त्यामुळेच तिला 'डोनाल्ड ट्रम्प' हे नाव देण्यात आले. वैद्यकीय तपासणीनुसार, या म्हशीला 'अल्बिनिझम' (रंगद्रव्यांची कमतरता) नावाची एक दुर्मिळ अनुवांशिक स्थिती आहे. या आजारामुळे तिच्या शरीरात 'मेलॅनिन' नावाचे रंगद्रव्य तयार होत नाही, ज्यामुळे तिची त्वचा आणि केस सोनेरी-पांढरे दिसतात. बांगलादेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारच्या थेट निर्देशानंतर, म्हशीचा बळी देण्याच्या नियोजित वेळेच्या अवघ्या काही तासांपूर्वीच पोलिसांनी या प्राण्याला सुरक्षेसाठी आपल्या ताब्यात घेतले.

हेही वाचा – Ebola Virus 2026 : इबोला विषाणूचा धोका वाढला! भारतात अलर्ट जारी, तर मुंबई महापालिका यंत्राणाही सतर्क; विलगीकरण केंद्र सज्ज

सरकारकडून नुकसानभरपाईची हमी

या संपूर्ण घडामोडीवर म्हशीचे मालक मोनिझुर्रहमान यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, "दुपारच्या सुमारास अचानक पोलीस अधिकारी आमच्याकडे आले आणि या म्हशीच्या संवर्धनासाठी तिला ताब्यात घेण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे सांगितले. आम्हाला सरकारशी कोणताही वाद घालायचा नव्हता, त्यामुळे आम्ही ती म्हैस सन्मानाने त्यांच्या स्वाधीन केली." प्रशासनाने मोनिझुर्रहमान यांना या बदल्यात योग्य ती आर्थिक नुकसानभरपाई देण्याची किंवा त्याऐवजी दुसरी म्हैस, गाय अथवा बैल उपलब्ध करून देण्याची अधिकृत हमी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number