Donald Trump : "कधीकधी हुकूमशहाची गरज असतेच!" दावोसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने खळबळ

आपल्या राज्यकारभाराच्या पद्धतीवर बोलताना ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, त्यांचे निर्णय कोणत्याही विशिष्ट विचारधारेने प्रेरित नसतात. ते परिस्थितीनुसार असतात आणि कधीकधी हुकूमशहाही बनावे लागते.

Donald Trump : &quotकधीकधी हुकूमशहाची गरज असतेच!" दावोसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने खळबळ

Donald Trump in Davos : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'मध्ये (जागतिक आर्थिक परिषद) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या खास शैलीत विधाने करून जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या नेतृत्वावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, "हो, मी एक हुकूमशहा आहे." मात्र, हे विधान त्यांनी एका वेगळ्या संदर्भात केले. टीकेचा समाचार घेताना ते पुढे म्हणाले की, "अनेकदा लोक माझ्यावर हुकूमशहा असल्याची टीका करतात, पण माझ्या मते कधीकधी परिस्थिती सुधारण्यासाठी अशा कठोर हुकूमशहाची देशाला गरज असते." आपल्या भाषणाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल त्यांनी स्वतःच आश्चर्य व्यक्त केले असून, यावेळचे रिव्ह्यूज खूपच सकारात्मक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

'कॉमन सेन्स'वर आधारित धोरणे
आपल्या राज्यकारभाराच्या पद्धतीवर बोलताना ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, त्यांचे निर्णय कोणत्याही विशिष्ट विचारधारेने प्रेरित नसतात. त्यांनी मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
– त्यांच्या मते, त्यांचे 95 टक्के निर्णय हे केवळ 'कॉमन सेन्स' (व्यवहारज्ञान) वर आधारित असतात.
– ही धोरणे ना 'कन्झर्व्हेटिव्ह' (पुराणमतवादी) असतात, ना 'लिबरल' (उदारमतवादी).
– अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी त्यांनी घेतलेले कठोर निर्णय हे व्यवहार्यतेच्या निकषावर घेतले गेल्याचे त्यांनी सांगितले.
– त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे त्यांना मिळालेली प्रसिद्धी ही त्यांच्या कामाचाच पावती असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा – Devendra Fadnavis: बळीराजाला मिळणार 24 तास वीज; 16 हजार मेगावॅट सौर ऊर्जा योजनेची मुख्यमंत्र्यांची दावोस मधून घोषणा

ग्रीनलँडच्या मुद्द्यावर नमती भूमिका
गेल्या काही दिवसांपासून ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याच्या ट्रम्प यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर, विशेषतः नाटो (NATO) देशांमध्ये तणावाचे वातावरण होते. मात्र, दावोसमध्ये ट्रम्प यांनी या विषयावर नरमाईचा सूर आळवला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांना ग्रीनलँडचा मुद्दा सोडवण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याची कोणतीही इच्छा नाही. "लोक म्हणत होते की मी बळाचा वापर करेन, पण मला त्याची गरज वाटत नाही," असे म्हणत त्यांनी या वादात काही पावले मागे घेतल्याचे संकेत दिले आहेत. यापूर्वी त्यांनी मांडलेला आक्रमक पवित्र्यामुळे डॅनिश सरकार आणि युरोपीय देशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती, जी आता काही प्रमाणात शांत होण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय करार आणि भविष्यातील रणनीती
नाटोचे सरचिटणीस मार्क रूट यांच्याशी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर ट्रम्प यांनी ग्रीनलँड आणि आर्क्टिक क्षेत्राबाबत एक सर्वसमावेशक आराखडा (Framework) तयार होत असल्याचे सांगितले. या संदर्भात त्यांनी खालील माहिती दिली:
– डॅनिश सरकार, ग्रीनलँड आणि अमेरिका यांच्यात वाटाघाटींचे सत्र सुरूच राहणार आहे. 
– ग्रीनलँडमध्ये रशिया किंवा चीनला लष्करी किंवा आर्थिक पाय रोवता येऊ नयेत, हा अमेरिकेचा मुख्य उद्देश आहे.
– या तडजोडीनंतर युरोपीय देशांवर प्रस्तावित केलेले अतिरिक्त टॅरिफ (व्यापार शुल्क) आता लागू केले जाणार नाहीत.
– हा नवीन करार अमेरिका आणि नाटो या दोन्ही पक्षांसाठी फायदेशीर आणि समाधानकारक असल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला आहे.

हेही वाचा – Trump's Board of Peace: ट्रम्प यांच्या 'बोर्ड ऑफ पीस'ला आठ बड्या मुस्लिम देशांची साथ; गाझाच्या भविष्याचा निर्णय आता 'या' देशांच्या हाती?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number