2000 Rupee Note: वर्ष 2016 मधील नोटाबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने बाजारात 100, 200, 500 आणि 2,000 मूल्याच्या नवीन नोटा चलनात आणल्या होत्या. सध्या फक्त 100, 200 आणि 500 च्या नोटा बाजारात वापरात असल्या, तरी आरबीआयने 2,000 च्या नोटांची छपाई थांबवून त्या चलनातून मागे घेतल्या आहेत. या नोटा आता दैनंदिन व्यवहारांसाठी स्वीकारल्या जात नसल्यामुळे अनेक नागरिकांकडे त्या अद्याप पडून आहेत. मात्र, या नोटा वाया जाणार नसून त्या बदलून घेण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आपल्या अधिकृत ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरून एक महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे.
आरबीआयने स्पष्ट केले आहे की, 2,000 ची नोट आजही पूर्णपणे वैध म्हणजेच कायदेशीर चलन (Legal Tender) आहे. ज्या नागरिकांकडे या नोटा शिल्लक आहेत, ते आरबीआयच्या देशभरातील 19 ‘इश्यू ऑफिस’पैकी (Issue Offices) कोणत्याही कार्यालयात जाऊन त्या सहज बदलून घेऊ शकतात.
Most ₹2000 banknotes in circulation have already been returned, but if you still have one, here's what you should know: – ₹2000 banknotes continue to be legal tender
– You can exchange them at the 19 RBI Issue Offices
– You can also send them through India Post to any RBI… pic.twitter.com/5k5AShAXSF — ReserveBankOfIndia (@RBI) July 9, 2026
आरबीआयच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाणे शक्य नसलेल्या नागरिकांसाठी टपाल सेवा (India Post) हा एक उत्तम पर्याय देण्यात आला आहे. नागरिक या नोटा पोस्टाद्वारे आरबीआयच्या कोणत्याही इश्यू ऑफिसमध्ये पाठवू शकतात आणि त्या बदल्यात तेवढीच रक्कम थेट स्वतःच्या बँक खात्यात जमा करून घेऊ शकतात. आरबीआयने जनतेला अशा महत्त्वपूर्ण घोषणांकडे लक्ष ठेवण्याचे आणि अधिकृत माहितीसाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन केले आहे.