Diwali Bonus Eligibility: दिवाळी जवळ येताच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये बोनसविषयी उत्सुकता वाढली आहे. अखेर मोदी सरकारने दिवाळी बोनस जाहीर केला असला तरी, हा लाभ सर्वांना लागू होणार नाही. या बोनससाठी काही विशिष्ट अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. सरकारने स्पष्ट केले आहे की, दिवाळी बोनस फक्त त्या कर्मचाऱ्यांना दिला जाईल ज्यांनी निर्धारित कालावधी पूर्ण केला आहे आणि दीर्घ रजा घेतलेली नाही. या अटींची पूर्तता न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनससाठी पात्र ठरवले जाणार नाही.
बोनसची रक्कम आणि गणना सूत्र
केंद्र सरकारने कमाल 7,000 बोनस मर्यादा निश्चित केली आहे. बोनसची गणना 7000 × 30 ÷ 30.4 = 6907.89 या सूत्रानुसार केली जाईल. बोनस कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारावर आधारित असेल आणि तो त्यांच्या हक्काच्या कालावधीनुसार दिला जाईल.
हेही वाचा – RBI Gold Holdings: दिलासादायक! आरबीआयचा सोन्याचा साठा 100 अब्ज डॉलर्सच्या उंबरठ्यावर
महागाई भत्त्यातही वाढ
दिवाळीपूर्वी सरकारने कर्मचाऱ्यांना आणखी एक दिलासा दिला आहे. महागाई भत्ता (DA) 55 टक्के वरून 58 टक्के इतका वाढवण्यात आला आहे. ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू झाली असून, थकबाकी ऑक्टोबरच्या पगारासह दिली जाणार आहे. या निर्णयाचा थेट फायदा लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे.
सणासुदीपूर्वी आर्थिक दिलासा
दरम्यान, दिवाळीच्या तोंडावर बोनस आणि डीए वाढ या दोन्ही निर्णयांमुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक आधार मिळणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, या निर्णयांचा उद्देश महागाईचा भार कमी करणे आणि कर्मचाऱ्यांचा सणासुदीचा आनंद वाढवणे हा आहे.