Nick Jonas: ‘देसी गर्ल’च्या विदेशी पतीचा इंडियन स्वॅग; निक जोनसने असं काय केलं की, भारतीय चाहतेही पडले त्याच्या प्रेमात

प्रियांकाचा 'द ब्लफ' हा चित्रपट लवकरच अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा उत्साह वाढवण्यासाठी निकने इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला.

Nick Jonas: ‘देसी गर्ल’च्या विदेशी पतीचा इंडियन स्वॅग; निक जोनसने असं काय केलं की, भारतीय चाहतेही पडले त्याच्या प्रेमात

Nick Jonas: बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस ही जोडी नेहमीच चर्चेत असते. पण यावेळी निक जोनसने अशा एका कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, जे पाहून भारतीय चाहते त्याचे कौतुक करताना थकत नाहीत. प्रियांकाच्या आगामी ‘द ब्लफ’ (The Bluff) या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी निकने चक्क प्रियांकाचे मंगळसूत्र हातात ब्रेसलेट म्हणून परिधान केले आहे.

नेमकं प्रकरण काय?
प्रियांकाचा ‘द ब्लफ’ हा चित्रपट लवकरच अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा उत्साह वाढवण्यासाठी निकने इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला. यात तो चित्रपटापासून प्रेरित होऊन एक ‘ब्लडी मेरी’ (कॉकटेल) बनवताना दिसतोय. मात्र, नेटकऱ्यांच्या नजरा निकच्या पेयापेक्षा त्याच्या हातातील काळ्या मण्यांच्या ब्रेसलेटवर खिळल्या. हे ब्रेसलेट दुसरे तिसरे काही नसून प्रियांकाचे मंगळसूत्र असल्याचे चाहत्यांच्या लक्षात आले.

‘नॅशनल जीजू’ ठरले ‘ग्रीन फ्लॅग’ पती
निकच्या या कृतीनंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर आला आहे. भारतीय संस्कृतीचा असा आदर करणारा पती मिळणे हे प्रियांकाचे नशीब असल्याची भावना चाहते व्यक्त करत आहेत. “निक खरोखरच ‘ग्रीन फ्लॅग’ (आदर्श पती) आहे, त्याने भारतीय संस्कृतीचा केलेला सन्मान पाहून आनंद झाला,” असं एका युजरने म्हटलं आहे. तथापी, दुसऱ्या एकाने म्हटलं आहे की, “आमच्या जीजूने पुन्हा एकदा मन जिंकलं!” “प्रियांकावर त्याचं किती प्रेम आहे, हे या छोट्याशा कृतीतून दिसून येतं,” असंही एका वापरकर्त्याने म्हटलं आहे. 

हेही वाचा – Bigg Boss Marathi 6 : ड्रामाक्वीन राखी सावंत रडली, प्रभूला मिठी मारत झाली भावूक; तन्वीशी ताटातूट केल्यानंतर खेळतेय माईंड गेम

चित्रपटाबद्दल निक काय म्हणाला?
व्हिडीओमध्ये निकने प्रियांकाच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले आहे. “मी हा चित्रपट दोनदा पाहिला असून तो अत्यंत रोमांचक आहे. हा चित्रपट नक्की पहा,” असे आवाहन त्याने जागतिक स्तरावरील चाहत्यांना केले आहे. थोडक्यात सांगायचे तर निक आणि प्रियांका केवळ एकमेकांच्या करिअरमध्येच खंबीरपणे उभे राहत नाहीत, तर एकमेकांच्या परंपरांचीही तितकीच जपणूक करतात, हे या व्हिडीओतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number