निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. 14 दिवसांनंतर 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता या नरधमांना फाशी देण्यात येणार आहे.
या नराधमांविरोधात डेथ वॉरंट जारी करण्यात आला आहे.
दिल्लीतील पाटीयाळा न्यायालयाने हा डेथ वॉरंट जारी केला.
विनय शर्मा, मुकेश सिंह, पवन गुप्ता आणि अक्षय ठाकूर या नराधमांना फाशी देण्यात येणार आहे.
माझ्या मुलीला न्याय मिळाला. आज आमच्यासाठी सर्वात मोठा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली.
या निर्णयामुळे न्याय यंत्रणेवरील लोकांचा विश्वास आणखी दृढ होईल अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली.
दिल्लीत 16 डिसेंबर 2012 ला चालत्या बसमध्ये निर्भयावर बलात्कार केला गेला होता. या सर्व प्रकारानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.
या निर्णयानंतर अनेकांनी ट्विटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.