Datta Jayanti 2025 : दत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला जुळून आलाय शुभ योग; जाणून घ्या महत्त्व, पूजा विधी

दत्तगुरूंचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला संध्याकाळी प्रदोष काळात झाला होता. त्यामुळे दत्त जयंतीचा उत्सव संध्याकाळी दत्ताचा पाळणा हलवून केला जातो.

Datta Jayanti 2025 : दत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला जुळून आलाय शुभ योग; जाणून घ्या महत्त्व, पूजा विधी

Datta Jayanti 2025 : मार्गशीर्ष महिन्याला (Margashirsha Month) श्रावण महिन्यासारखेच महत्त्व आणि पवित्रता असल्याने अवघ्या काही दिवसांत हा महिना सुरू होणार आहे. या पवित्र मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथीला दत्त जयंती (Datta Jayanti) साजरी केली जाते. महाराष्ट्रात दत्त जयंतीचा (Datta Jayanti) मोठा उत्साह पाहायला मिळतो. यंदा, म्हणजेच 2025 मध्ये, दत्त जयंतीला अनेक वर्षांनंतर अतिशय शुभ योग जुळून आला आहे.

जाणून घ्या दत्त जयंतीची तिथी
दत्तगुरूंचा जन्म संध्याकाळी प्रदोष काळात झाला होता. त्यामुळे दत्त जयंतीचा उत्सव संध्याकाळी दत्ताचा पाळणा हलवून केला जातो. पंचांगानुसार, मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8:38 वाजल्यापासून 5 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 4:44 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे, उदय तिथीनुसार दत्त जयंती गुरुवारी 4 डिसेंबर 2025 रोजी साजरी करण्यात येणार आहे.

दत्त जयंतीचे महत्त्व
हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि या महिन्याच्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. या दिवसाला विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला, ज्यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे रूप मानले जाते. 2025 मध्ये दत्त जयंती गुरुवारी येत असल्याने, हा दिवस दत्तगुरूंची पूजा आणि नामस्मरणासाठी अधिक शुभ मानला जातो.  दत्त जयंतीनिमित्त भक्त त्यांच्या मूर्तीची किंवा पादुकांची पूजा करतात, स्तोत्रपठण करतात आणि ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या मंत्राचा जप करतात.

हेही वाचा – Anganewadi Jatra 2026 : भाविकांसाठी आनंदाची बातमी, मालवणच्या भराडी देवीचा यात्रेला कौल

दत्त जयंतीचा पूजाविधी आणि नैवेद्य
– दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि त्यानंतर दत्तात्रेय महाराजांच्या (Lord Dattatreya) मूर्तीची किंवा फोटोची पूजा करावी. – पूजा करताना महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालावा. त्यानंतर अष्टगंध लावून हार आणि फुले अर्पण करावीत. सोनचाफ्याची फुले वाहिल्यास अधिक सुंदर!
– यानंतर धूप, अगरबत्ती आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून महाराजांचा नामजप (Japa) करावा.
– दत्त बावनी, गुरुचरित्र अध्याय 16 व 18, गुरुलीलामृत किंवा स्वामी चरित्र सारामृत हे दत्त संप्रदायातील ग्रंथ वाचून पारायण (Parayana) करावे.
– त्यानंतर आरती करून प्रसाद वाटावा.
– दत्त महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करावा किंवा कोणतीही पिवळी मिठाई आणि फळे नैवेद्य म्हणून अर्पण करता येतात.

औदुंबर वृक्षाच्या प्रदक्षिणेचे फायदे
औदुंबर वृक्षाच्या प्रदक्षिणेला दत्त संप्रदायात खूप महत्त्व आहे. नियमितपणे औदुंबर प्रदक्षिणा केल्यास विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढते, अशी मान्यता आहे. एकाग्रता वाढल्यामुळे आध्यात्मिक प्रवास (Spiritual Journey) सुखकर होऊन आपले जीवन समाधानी राहण्यास मदत होते. औदुंबर वृक्षाच्या बुंधाशी साक्षात दत्त अवतारी श्री नृसिहसरस्वती महाराजांचा वास असतो. त्यामुळे प्रदक्षिणा केल्यास दत्त महाराजांचा आशीर्वाद (Blessings) मिळतो. औदुंबराखाली एका ब्राह्मणाला भोजन दिल्यास अनेक ब्राह्मणांना भोजन घातल्याचे फळ प्राप्त होते, असे मानले जाते.

हेही वाचा – Dandakram Parayan: काशीत 50 दिवसांच्या दंडक्रम पारायणाची आज पूर्णाहुती; 19 वर्षीय वेदमूर्ती देवव्रत रेखे यांचा भव्य सन्मान

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number