वारंवार UPI व्यवहार केल्याने CIBIL Score खराब होतो का? जाणून घ्या डिजिटल पेमेंटमागील ‘हे’ तांत्रिक सत्य!

डिजिटल पेमेंटच्या युगात स्वतःच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे हे एक मोठे आव्हान आहे. अंदाधुंद युपीआय व्यवहार तुमच्या बजेटवर परिणाम करू शकतात. यामुळे...

वारंवार UPI व्यवहार केल्याने CIBIL Score खराब होतो का? जाणून घ्या डिजिटल पेमेंटमागील ‘हे’ तांत्रिक सत्य!

Relation between UPI Transactions and CIBIL Score : आजकाल खिशात रोकड ठेवण्यापेक्षा मोबाईलवरून स्कॅन करून पैसे देणे अधिक सोपे झाले आहे. चहाच्या टपरीपासून ते मोठ्या शोरूमपर्यंत सगळीकडे युपीआयचा (UPI) वापर वाढला आहे. मात्र, दिवसातून अनेक वेळा छोटे-मोठे डिजिटल व्यवहार केल्याने क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोर कमी होतो, अशी एक भीती अनेकांच्या मनात असते. परंतु, तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की, युपीआय ट्रान्झॅक्शनचा तुमच्या क्रेडिट स्कोरवर कोणताही थेट परिणाम होत नाही. तुम्ही दिवसातून 5 वेळा पेमेंट करा किंवा 50 वेळा, यामुळे तुमचा स्कोर बदलत नाही. याचे मुख्य कारण असे की, युपीआयद्वारे तुम्ही तुमच्या स्वतःच्या बँक खात्यातील पैसे वापरता, कोणतेही कर्ज किंवा क्रेडिट घेत नाही.

सिबिल स्कोरवर नेमका परिणाम कशाचा होतो?
तुमचा क्रेडिट स्कोर हा प्रामुख्याने तुम्ही घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीवर अवलंबून असतो. खालील बाबी तुमच्या स्कोरसाठी महत्त्वाच्या ठरतात:
– कर्जाचे हप्ते (EMI): वेळेवर हप्ते न भरल्यास स्कोर वेगाने कमी होतो.
– क्रेडिट कार्ड बिल: वेळेत पेमेंट न करणे तुमच्या क्रेडिट प्रोफाइलला हानी पोहोचवते.
– बँक बॅलन्स: खाते वारंवार Zero Balance च्या जवळ पोहोचणे आर्थिक अस्थिरता दर्शवते.
– कर्जाचा इतिहास: तुम्ही किती वेळा आणि कोणत्या प्रकारचे कर्ज घेतले आहे, यावर रेटिंग ठरते.

हेही वाचा – Income Tax Benefit : करदात्यांना मोठा दिलासा! मुलांच्या शिक्षणावर आता मिळणार 2.88 लाखांपर्यंत टॅक्स सूट; जाणून घ्या नवीन गणित

कर्ज घेताना बँक स्टेटमेंट का तपासले जाते?
जरी युपीआयमुळे स्कोर पडत नसला तरी, भविष्यात कर्ज घेताना बँका तुमचे बँक स्टेटमेंट (Bank Statement) बारकाईने तपासतात. जर तुमच्या स्टेटमेंटमध्ये दर 2 मिनिटांनी 10 किंवा 20 रुपयांचे शेकडो किरकोळ व्यवहार दिसत असतील, तर ते स्टेटमेंट अत्यंत लांब आणि गुंतागुंतीचे होते. कर्ज देणाऱ्या संस्था तुमच्या खर्चाच्या सवयी आणि शिस्त पाहतात. जर तुमचे उत्पन्न आणि खर्च याचे प्रमाण व्यस्त असेल किंवा अनावश्यक खर्च जास्त असतील, तर बँका तुम्हाला कर्ज देण्यास टाळाटाळ करू शकतात. त्यामुळे, युपीआयचा वापर तुमच्या आर्थिक प्रतिमेवर अप्रत्यक्षपणे परिणाम करू शकतो.

आर्थिक शिस्त आणि जबाबदार गुंतवणूकदार
डिजिटल पेमेंटच्या युगात स्वतःच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे हे एक मोठे आव्हान आहे. अंदाधुंद युपीआय व्यवहार तुमच्या बजेटवर परिणाम करू शकतात. यामुळे तुम्ही बँकांच्या नजरेत 'हाय रिस्क' ग्राहक ठरू शकता. त्यामुळे डिजिटल पेमेंट जरूर करा, पण आपल्या बँक शिल्लक आणि खर्चात योग्य संतुलन राखणे गरजेचे आहे. एक चांगला गुंतवणूकदार आणि जबाबदार ग्राहक म्हणून प्रतिमा राखण्यासाठी केवळ सिबिल स्कोरच नव्हे, तर सुटसुटीत बँक स्टेटमेंट असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भविष्यातील मोठ्या आर्थिक गरजांसाठी ही शिस्त तुम्हाला निश्चितपणे मदत करेल.

हेही वाचा – DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 2 टक्के वाढ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, पाहा किती वाढणार तुमचा पगार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number