Civil Aircraft Production : आता भारतात तयार होणार व्यावसायिक विमाने; HAL आणि रशियामध्ये ‘सुपरजेट-100’ साठी ऐतिहासिक करार

हैदराबाद येथे सुरू असलेल्या 'विंग्स इंडिया' प्रदर्शनादरम्यान या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या भागीदारीमुळे &quotमेक इन इंडिया&quot मोहिमेला मोठे बळ मिळणार आहे.

Civil Aircraft Production : आता भारतात तयार होणार व्यावसायिक विमाने; HAL आणि रशियामध्ये ‘सुपरजेट-100’ साठी ऐतिहासिक करार

Civil Aircraft Production : भारतीय एरोस्पेस क्षेत्रासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि रशियाची युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (UAC) यांनी भारतात शक्तिशाली ट्विन-इंजिन 'सुपरजेट-100' (SJ-100) विमान तयार करण्यासाठी हातमिळवणी केली आहे. हैदराबाद येथे सुरू असलेल्या 'विंग्स इंडिया' प्रदर्शनादरम्यान या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या भागीदारीमुळे "मेक इन इंडिया" मोहिमेला मोठे बळ मिळणार असून नागरी विमान वाहतुकीसाठी भारताचे परदेशी विमानांवरील अवलंबित्व कमी होणार आहे.

तीन वर्षांत उत्पादनाला होणार सुरुवात
HAL चे सीएमडी डी. के. सुनील यांनी या प्रकल्पाबद्दल माहिती देताना सांगितले की, पुढील तीन वर्षांत भारतीय सुविधांमध्ये SJ-100 विमानांचे उत्पादन सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत या श्रेणीतील सुमारे 200 हून अधिक विमानांची गरज आहे. विमानांच्या उत्पादनाला वेळ लागणार असल्याने, सुरुवातीच्या टप्प्यात रशियाकडून 10 ते 20 विमाने थेट भाड्याने घेण्याची योजना आहे. पुढील दीड वर्षात भारताला साधारण 10 तयार विमाने मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे प्रादेशिक हवाई सेवा तातडीने सुरू करता येईल.

हेही वाचा – Final Flight : प्रदीर्घ सेवेनंतर कॅप्टन ओम यांनी घेतली 'शेवटची झेप'; आपल्या 23 वर्षांच्या सहकाऱ्याला केलं 'असं' गुडबाय

काय आहेत 'सुपरजेट-100' ची वैशिष्ट्ये?
सुपरजेट-100 हे एक अत्याधुनिक 'नॅरो-बॉडी' व्यावसायिक जेट आहे. हे विमान प्रादेशिक उड्डाणांसाठी जगातील सर्वोत्तम विमानांपैकी एक मानले जाते. या विमानात साधारण 87 ते 108 प्रवासी बसू शकतात. सध्या रशियातील अनेक एअरलाईन्स आणि सरकारी यंत्रणा या विमानाचा यशस्वी वापर करत आहेत. भारतात याचे उत्पादन सुरू झाल्यामुळे लहान शहरांमधील हवाई प्रवास अधिक स्वस्त आणि सुलभ होईल.

प्रादेशिक हवाई वाहतुकीसाठी 'गेम-चेंजर' ठरणार
या करारानुसार, HAL परवाना आधारावर (Licence-based) विमानांची निर्मिती करेल. यामुळे रशियाकडून भारताला प्रगत तांत्रिक ज्ञान (Technology Transfer) देखील मिळणार आहे. रशियन वृत्तसंस्था 'TASS' नुसार, हा करार भारताच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रासाठी एक 'गेम-चेंजर' ठरू शकतो. भारत आणि रशियामधील ही भागीदारी केवळ संरक्षण क्षेत्रापुरती मर्यादित न राहता, आता नागरी उड्डाण क्षेत्रातही दोन्ही देशांचे संबंध अधिक घट्ट करणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number