Cloudflare Down: इंटरनेट विस्कळीत! ट्विटर, ChatGPT, Bet365 सह अनेक वेबसाइट्स ठप्प

या आउटेजमुळे X (पूर्वीचे ट्विटर), Letterboxd, ChatGPT, Bet365 यांसारख्या अनेक लोकप्रिय वेबसाइट्स काही काळ पूर्णपणे ठप्प झाल्या.<br/>

Cloudflare Down: इंटरनेट विस्कळीत! ट्विटर, ChatGPT, Bet365 सह अनेक वेबसाइट्स ठप्प

Cloudflare Down: जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांना मंगळवारी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला, कारण इंटरनेट पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या क्लाउडफ्लेअर कंपनीमध्ये गंभीर तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. या आउटेजमुळे X (पूर्वीचे ट्विटर), Letterboxd, ChatGPT, Bet365 यांसारख्या अनेक लोकप्रिय वेबसाइट्स काही काळ पूर्णपणे ठप्प झाल्या.

क्लाउडफ्लेअरचे नेटवर्क डाऊन

क्लाउडफ्लेअर हा जगभरातील लाखो वेबसाइट्सना सुरक्षा आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट सेवा पुरवणारा एक प्रमुख इंटरनेट नेटवर्क पुरवठादार आहे. त्यांच्यातील अचानक झालेल्या बिघाडामुळे अनेक प्लॅटफॉर्मवर “Internal server error on Cloudflare’s network. Please try again in a few minutes,” असा संदेश दिसू लागला. काही वेबसाइट्सवर तर वापरकर्त्यांना थेट Blocked असल्याचा संदेश दिसत होता, ज्यामुळे अनेकजण घाबरले.

Twitter आणि Letterboxd बंद

दरम्यान, अनेक यूजर्सला X (ट्विटर) ला पान ओपन न होणे किंवा एरर मेसेज दिसत होता. Letterboxd सारख्या फिल्म रिव्ह्यू साइटवरही तीच परिस्थिती होती.

हेही वाचा – Budjet Mobile Phones : बजेटमध्ये गॅजेट! दहा हजारांपर्यंत मिळू शकतात 'हे' जबरदस्त स्मार्टफोन्स

क्लाउडफ्लेअरचा अधिकृत प्रतिसाद

कंपनीने स्टेटस पेजवर जाहीर केले, "क्लाउडफ्लेअरला समस्या माहित आहे आणि आम्ही तिची चौकशी करत आहोत. अधिक तपशील लवकरच पुरवले जातील." थोड्या वेळाने 'समस्या सोडवली' असे अपडेट देण्यात आले, परंतु लगेचच पुन्हा काही युजर्सला अशाचं समस्या येऊ लागल्या. म्हणजेच बिघाड पूर्णपणे दूर झालेला नसल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा – Aadhaar Update: पालकांनो लक्ष द्या! मुलांचे आधारकार्ड वेळेत अपडेट करा, नाहीतर मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल; स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया जाणून घ्या

DownDetector ही ठप्प  

याशिवाय, वेबसाइट आउटेज ट्रॅक करणारे DownDetector स्वतःच आउटेजचा बळी ठरले. जेव्हा ते लोड झाले तेव्हा त्यांनी जगभरात तक्रारींमध्ये मोठी वाढ दाखवली. तथापी, लोकप्रिय बेटिंग साइट Bet365 वर तर वापरकर्त्यांना थेट सांगण्यात आले की, 'Sorry, you have been blocked.' यामुळे वापरकर्ते घाबरले, परंतु तज्ज्ञांनी स्पष्ट केले की क्लाउडफ्लेअर डाऊन असल्यामुळे हे 'ब्लॉक' मेसेज चुकीने दिसत आहेत. तथापी, ChatGPT देखील बंद झाले. क्लाउडफ्लेअरने समस्या दुरुस्त झाल्याचे सांगितल्यानंतर काही मिनिटांतच अनेक वेबसाइट्स पुन्हा बंद पडल्याचे दिसले. यामुळे ही समस्या पूर्णपणे सुटली नसून अजून तपास सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number