Char Dham Yatra 2026: चार धाम यात्रेचे नियम बदलले; 23 मार्चपासून ‘ग्रीन कार्ड’ प्रक्रिया सुरू; पाहा काय आहेत नवीन अटी

या नवीन नियमानुसार, 12 पेक्षा अधिक प्रवासी क्षमता असलेल्या परराज्यातील व्यावसायिक वाहनांसाठीचे ग्रीन कार्ड केवळ 15 दिवसांसाठीच वैध असेल.

Char Dham Yatra 2026: चार धाम यात्रेचे नियम बदलले; 23 मार्चपासून ‘ग्रीन कार्ड’ प्रक्रिया सुरू; पाहा काय आहेत नवीन अटी

Char Dham Yatra 2026: आगामी चार धाम यात्रेच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड परिवहन विभागाने प्रवासी सुरक्षिततेसाठी कडक पावले उचलली असून 23 मार्च 2026 पासून 'ग्रीन कार्ड' (Green Card) देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यंदा अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी वाहनांच्या 'फिटनेस' तपासणीवर विशेष भर दिला जात आहे. या नवीन नियमानुसार, 12 पेक्षा अधिक प्रवासी क्षमता असलेल्या परराज्यातील व्यावसायिक वाहनांसाठीचे ग्रीन कार्ड केवळ 15 दिवसांसाठीच वैध असेल, तर उत्तराखंडमधील स्थानिक वाहनांसाठी हे कार्ड नेहमीप्रमाणे सहा महिन्यांसाठी वैध राहील. 23 मार्चला ऋषिकेश येथे पारंपरिक विधी पार पडल्यानंतर ग्रीन कार्डसोबतच 'ट्रिप कार्ड' वितरणासदेखील सुरुवात होईल.

19 एप्रिलपासून यात्रेचा प्रारंभ; ऑनलाइन नोंदणी आवश्यक
यंदा चार धाम यात्रेचा शुभारंभ 19 एप्रिल रोजी गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांचे दरवाजे उघडल्यानंतर होणार आहे. यात्रेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक वाहनाचा अद्ययावत तपशील प्रशासनाकडे असावा, हा ग्रीन कार्डचा मुख्य उद्देश आहे. वाहन मालकांनी परिवहन विभागाच्या greencard.uk.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करणे बंधनकारक आहे. यासाठी वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (RC), फिटनेस प्रमाणपत्र, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) आणि कर भरल्याची पावती सादर करावी लागेल. तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्यानंतरच हे कार्ड जारी केले जाईल.

'ट्रिप कार्ड'मुळे प्रवाशांची सुरक्षा होणार अधिक भक्कम
ग्रीन कार्ड मिळाल्यानंतर प्रत्येक स्वतंत्र प्रवासासाठी 'ट्रिप कार्ड' (Trip Card) मिळवणे अनिवार्य आहे. या कार्डमध्ये चालक आणि सर्व प्रवाशांची नावे, पत्ते, मोबाईल क्रमांक आणि प्रवासाच्या तारखांची सविस्तर नोंद असेल. यामुळे प्रवासादरम्यान एखादी आणीबाणीची परिस्थिती किंवा अपघात उद्भवल्यास प्रशासनाला प्रवाशांची माहिती त्वरित मिळवणे आणि त्यांच्याशी संपर्क साधणे सुलभ होणार आहे. तसेच भाविकांनी कोणत्या तीर्थक्षेत्रांना भेट दिली, याचा सर्वंकष डेटा याद्वारे संकलित केला जाईल.

हेही वाचा – Gudhi Padwa 2026 : हिंदू नववर्षाचे स्वागत 'ब्रह्मध्वज' म्हणजेच 'गुढी' उभारूनच का केले जाते? जाणून घ्या, याचा गौरवशाली इतिहास

ट्रेकिंग आणि कॅम्पिंगसाठी जाणाऱ्या पर्यटकांनाही नियम लागू
यंदा केवळ भाविकांच्या वाहनांनाच नव्हे, तर गढवाल प्रदेशातील चोपटा, हर्षिल, 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' यांसारख्या पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांनाही 'ग्रीन कार्ड' अनिवार्य करण्यात आले आहे. ट्रेकिंग, कॅम्पिंग किंवा साहसी पर्यटनासाठी येणाऱ्या व्यावसायिक वाहनांची माहिती परिवहन विभागाच्या दप्तरी नोंदवली जावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, खाजगी वाहनांसाठी (Private Vehicles) ग्रीन कार्ड किंवा ट्रिप कार्ड मिळवणे सक्तीचे नसेल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number