Rakesh Kishore: दिल्लीतील करकरडूमा न्यायालयात गोंधळ; माजी CJI गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्या वकिलाला चप्पलांनी मारहाण

राकेश किशोर न्यायालयात हजर असताना अचानक काही वकील त्यांच्या दिशेने धावले, त्यांना ढकलले आणि चप्पलांनी हल्ला केला.

Rakesh Kishore: दिल्लीतील करकरडूमा न्यायालयात गोंधळ; माजी CJI गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्या वकिलाला चप्पलांनी मारहाण

Rakesh Kishore: दिल्लीतील करकरडूमा न्यायालय संकुलात सोमवारी मोठा गोंधळ उडाला. सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर बूट फेकणारे वकील राकेश किशोर यांना न्यायालयातील काही वकिलांकडून चप्पलांनी मारहाण करण्यात आली. राकेश किशोर न्यायालयात हजर असताना अचानक काही वकील त्यांच्या दिशेने धावले, त्यांना ढकलले आणि चप्पलांनी हल्ला केला. परिस्थिती तणावपूर्ण होताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून त्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था केली आणि त्यांना बाहेर काढले.

हेही वाचा – Loan Waiver : सार्वजनिक बँकांकडून 6 लाख कोटींची कर्जमाफी; बँकांची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचा सरकारचा संसदेत दावा

बूटफेक प्रकरणानंतर बार कौन्सिलने राकेश किशोर यांचे वकिली परवाना निलंबित केला आहे. व्यापक निषेध असूनही त्यांना आपल्या कृतीबाबत खेद नाही, असे त्यांनी सांगितले. देव स्वप्नात दर्शन देऊन अशी सूचना देत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 71-72 वर्षीय राकेश किशोर हे 2009 पासून दिल्ली बार कौन्सिलमध्ये नोंदणीकृत वरिष्ठ वकील असून, निलंबनामुळे ते पुढील आदेश मिळेपर्यंत कोणत्याही खटल्यात वकिली करू शकत नाहीत.

हेही वाचा – DPIIT New Draft: भारतातील AI-कॉपीराइट धोरणात मोठे बदल; DPIIT कडून नवा मसुदा जाहीर

दरम्यान, ही संपूर्ण घटना 6 ऑक्टोबर 2025 रोजी घडलेल्या त्या प्रकरणाशी संबंधित आहे, ज्यात सर्वोच्च न्यायालयातील नियमित सुनावणीदरम्यान राकेश किशोर यांनी कोर्ट नंबर 1 मध्ये बसलेले सीजेआय बी.आर. गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. मध्य प्रदेशातील खजुराहो येथील जवारी मंदिरातील भगवान विष्णूच्या कापलेल्या मूर्तीच्या जीर्णोद्धारावरील खटल्यादरम्यान सकाळी 11:35 वाजता ही घटना घडली होती. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना तेव्हाच ताब्यात घेतले होते. दरम्यान, गवई यांनी त्या वेळी राकेश किशोर यांना माफ केले असले तरी न्यायालय संकुलातील वकिलांचा संताप मात्र ओसरलेला दिसत नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number