Speed Post New Rates: ‘स्पीड पोस्ट’च्या दरात 1 ऑगस्टपासून बदल; टपाल विभागाकडून नवीन दरपत्रक जारी

याव्यतिरिक्त इतर सर्व वस्तू 'पार्सल' श्रेणीत मोडतील. तसेच किरकोळ आणि घाऊक (Bulk) ग्राहकांसाठी 24 तासांत आणि 48 तासांत वितरण करणाऱ्या विशेष स्पीड पोस्ट सेवांचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत.<br/>

Speed Post New Rates: ‘स्पीड पोस्ट’च्या दरात 1 ऑगस्टपासून बदल; टपाल विभागाकडून नवीन दरपत्रक जारी

Speed Post New Rates: भारतीय टपाल विभागाने (India Post) ग्राहकांच्या सोयीसाठी प्रथमच 'दस्तऐवज' (Document) या संज्ञेचे स्पष्ट वर्गीकरण केले आहे. या नव्या नियमांनुसार पत्रे, छापील साहित्य आणि पुनर्विक्री मूल्य नसलेल्या भेटवस्तू किंवा साहित्याचा समावेश दस्तऐवजात केला जाईल आणि त्यांच्यावर कमी दर आकारले जातील. याव्यतिरिक्त इतर सर्व वस्तू 'पार्सल' श्रेणीत मोडतील. तसेच किरकोळ आणि घाऊक (Bulk) ग्राहकांसाठी 24 तासांत आणि 48 तासांत वितरण करणाऱ्या विशेष स्पीड पोस्ट सेवांचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत.

दस्तऐवज श्रेणीत कोणत्या वस्तूंचा समावेश?
नव्या अधिसूचनेनुसार, बँक, वित्त आणि विमा क्षेत्राशी संबंधित महत्त्वाचे साहित्य जसे की वेलकम किट्स, पासबुक, चेकबुक, प्लास्टिक कार्ड्स आणि डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्स आता 'दस्तऐवज' मानले जातील. तसेच पॅन कार्ड, सरकारी ओळखपत्रे, पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स यांसारख्या अधिकृत कागदपत्रांचा समावेशही याच श्रेणीत असेल. याशिवाय, 500 ग्रॅमपर्यंत वजन असणारी बिगर-व्यावसायिक पाकिटे (उदा. राखी किंवा शुभेच्छा पत्रे) दस्तऐवज म्हणूनच ग्राह्य धरली जातील.

किरकोळ ग्राहकांसाठीचे सुधारित टपाल शुल्क
किरकोळ ग्राहकांसाठीचे नियमित दर कायम ठेवण्यात आले असले, तरी 1 ऑगस्टपासून लागू होणाऱ्या नियमांनुसार 24 स्पीड पोस्ट सेवेसाठी अंतराच्या व वजनाच्या आधारावर 38 ते 186 दरम्यान शुल्क आकारले जाईल. यात 50 ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या पाकिटासाठी स्थानिक टपाल दर 38 तर देशव्यापी वितरणासाठी 94 (अधिक GST) असेल. तसेच 51 ते 250 ग्रॅम वजनासाठी 118 ते 154 आणि 251 ते 500 ग्रॅमसाठी 140 ते 186 आकारले जातील. किरकोळ ग्राहकांसाठी 48-तासी स्पीड पोस्टचे दर 61 ते 121 दरम्यान असतील.

हेही वाचा – Inflation News: मोठी बातमी! ऑगस्टपासून बसणार महागाईचा आणखी फटका; चहा, कपड्यांसह 'या' वस्तू महागण्याची शक्यता

घाऊक ग्राहकांसाठी दर आणि सेवांची व्याप्ती
मोठ्या प्रमाणात बुकिंग करणाऱ्या (Bulk) ग्राहकांसाठी 24-तासी सेवेचे शुल्क 38 ते 100 तर 48-तासी सेवेचे शुल्क 48 ते 72 दरम्यान निश्चित केले आहे. सध्या या 24-तासी आणि 48-तासी जलद स्पीड पोस्ट सेवा देशातील मुख्य 6 शहरांमध्ये उपलब्ध आहेत: दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबाद.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number