Chaiwala’z Founder Rohit Sharma: तरुण उद्योजकाच्या निधनाने खळबळ; ‘चायवालाज’चे संस्थापक रोहित शर्मा यांनी उचललं टोकाचं पाऊल

'चायवालाज' (Chaiwalaz) या गाजलेल्या स्टार्टअपचे 30 वर्षीय संस्थापक रोहित शर्मा यांनी शनिवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

Chaiwala’z Founder Rohit Sharma: तरुण उद्योजकाच्या निधनाने खळबळ; ‘चायवालाज’चे संस्थापक रोहित शर्मा यांनी उचललं टोकाचं पाऊल

Chaiwala'z Founder Rohit Sharma : राजस्थानमधील दौसा येथील साकेत कॉलनीत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. 'चायवालाज' (Chaiwalaz) या गाजलेल्या स्टार्टअपचे 30 वर्षीय संस्थापक रोहित शर्मा यांनी शनिवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. दुपारी खोलीचा दरवाजा बंद असल्याने कुटुंबीयांनी शंका येऊन दरवाजा तोडला असता रोहित फाशी घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन पूर्ण केले असून, घटनास्थळी कोणतीही नोट सापडलेली नाही.

17 व्या वर्षी व्यवसायात पदार्पण  
नर्सिंगचे शिक्षण घेतानाच रोहित यांनी अवघ्या 17 व्या वर्षी उद्योजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. जयपूरमधील मानसरोवर येथून त्यांनी 'चायवालाझ' नावाचे टी-कॅफे सुरू केले, जे तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध झाले. अल्पावधीतच त्यांनी व्यवसायाचा विस्तार करत 7 आऊटलेट्स यशस्वीपणे चालवले. त्यांच्या या नाविन्यपूर्ण स्टार्टअप मॉडेलची दखल घेऊन 'ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम'तर्फे 2022 मध्ये त्यांना 'नॅशनल MSME अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आले होते. व्यवसायाव्यतिरिक्त 'मिशन हेल्पलाइन'च्या माध्यमातून ते सामाजिक कार्यातही सक्रिय होते.

व्यवसाय बंद करून अध्यात्मात केले पदार्पण
यशाच्या शिखरावर असतानाच, सुमारे 6 महिन्यांपूर्वी रोहित यांनी अचानक आपली सर्व 7 कॅफे आऊटलेट्स बंद केली. व्यवसाय गुंडाळल्यानंतर त्यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आणि धार्मिक स्थळांना भेटी देणे सुरू केले. या काळात त्यांनी लिहिलेले 'तत्सुखे सुखित्वम्' हे पुस्तक 'बेस्टसेलर' ठरले होते. सोशल मीडियावर त्यांनी आपले नाव बदलून 'रोहित शिवोहम' असे ठेवले होते.

हेही वाचा – Aditi Sharma: लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच सुरू झाला छळ? अभिनेत्रीचा पतीसह सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

राजकीय सहभाग आणि कुटुंबावर कोसळलेला दुःखाचा डोंगर
रोहित यांनी 2024 च्या दौसा विधानसभा पोटनिवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु वरिष्ठ नेत्यांच्या आश्वासनानंतर तो मागे घेतला. त्यांच्या पश्चात मेडिकल दुकान चालवणारे वडील, शिक्षिका असलेली पत्नी आणि एक 7 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. या यशस्वी उद्योजकाने टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध पोलीस घेत आहेत.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number