West Asia Conflict : पश्चिम आशियातील संघर्षादरम्यान भारतीयांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार सरसावले; युद्धभूमीतून तब्बल 5,98,000 भारतीयांची घरवापसी

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष दुसऱ्या महिन्यात प्रवेश करत असतानाच, भारत सरकार आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.<br/>

West Asia Conflict : पश्चिम आशियातील संघर्षादरम्यान भारतीयांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार सरसावले; युद्धभूमीतून तब्बल 5,98,000 भारतीयांची घरवापसी

West Asia Conflict: पश्चिम आशिया आणि आखाती प्रदेशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत सुमारे 5,98,000 प्रवासी भारतात सुखरूप परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव असीम आर महाजन यांनी बुधवारी दिली. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष दुसऱ्या महिन्यात प्रवेश करत असतानाच, भारत सरकार आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

दुबईतील घटनेत 3 भारतीय किरकोळ जखमी
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दुबईमध्ये विमान अडवण्याच्या (Interception) कारवाई दरम्यान पडलेल्या ढिगाऱ्यामुळे झालेल्या दुर्घटनेत 3 भारतीय नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. दक्षिण दुबईमध्ये घरांवर हा ढिगारा पडल्याने दोन भारतीयांसह एक बांगलादेशी आणि एक श्रीलंकन नागरिकही जखमी झाला आहे. जखमी भारतीयांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यापैकी एकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. भारतीय वाणिज्य दूतावास या जखमींच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सतत संपर्कात असून त्यांना सर्वतोपरी मदत पुरवली जात आहे.

विमान वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर
विमान उड्डाणांवरील निर्बंध आणि अनेक देशांची हवाई हद्द बंद असल्याने प्रवासासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. कुवेत आणि बहरीनची हवाई हद्द बंद असल्याने तिथले प्रवासी सौदी अरेबियाच्या दम्माम विमानतळावरून भारतात येत आहेत. इराणमधून अर्मेनियामार्गे, इस्रायलमधून इजिप्त-जॉर्डनमार्गे आणि इराकमधून सौदीमार्गे भारतीयांना मायदेशी आणण्याची सोय करण्यात आली आहे. आज युएईमधून सुमारे 90 विमानांची उड्डाणे अपेक्षित असून कतार एअरवेजची 8 ते 10 उड्डाणे भारतात येण्याची शक्यता आहे.

विशेष नियंत्रण कक्ष आणि चोवीस तास मदत
परराष्ट्र मंत्रालय पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारतीय नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी एक ‘विशेष नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रदेशातील भारतीय दूतावास आणि कार्यालये अहोरात्र काम करत असून स्थानिक सरकारांच्या संपर्कात आहेत. 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या मदतकार्यामुळे आतापर्यंत लाखो भारतीयांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात यश आले आहे.

हेही वाचा – Global Oil Crisis: भारतावर दुहेरी संकट! होर्मुझनंतर आता ‘हा’ समुद्री मार्ग धोक्यात; पेट्रोल-डिझेल महागणार?

दुर्दैवी घटना: दोन भारतीयांचे पार्थिव मायदेशी दाखल
या संकटाच्या काळात काही दुर्दैवी घटनाही समोर आल्या आहेत. इराकच्या किनाऱ्याजवळ 11 मार्च रोजी ‘एमटी सेफ सी विष्णू’ जहाजावर झालेल्या दुर्घटनेत निधन झालेल्या एका भारतीयाचे आणि 29 मार्च रोजी कुवेतमध्ये निधन झालेल्या दुसऱ्या भारतीय नागरिकाचे पार्थिव आज भारतात आणण्यात आले आहे. सरकारने या कठीण काळात संबंधित कुटुंबीयांप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या असून त्यांना आवश्यक ती कायदेशीर आणि प्रशासकीय मदत पुरवली जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number