Indian Pilot Trainees Death in Canada: कॅनडामध्ये उड्डाणाचे (Flight Training) प्रशिक्षण घेणाऱ्या दोन भारतीय विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनोज शिवकुमार आणि श्रीसरन तिरुज्ञानसंबंथम अशी दुर्दैवी मृत्यू झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांची नावे आहेत. हार्व्ह्स एअर या संस्थेकडून चालवले जाणारे ‘सेसना 172’ (Cessna 172) हे छोटे विमान कॅनडातील सस्काचेवान प्रांतात असलेल्या किस्बेजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अचानक कोसळले. या भीषण दुर्घटनेत विमानात असलेल्या दोन्ही भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा जागीच मृत्यू झाला.
व्यावसायिक परवान्यासाठी रात्रीचे उड्डाण करताना दुर्घटना
दुर्घटनाग्रस्त विमानात दोघेही परवानाधारक वैमानिक म्हणून प्रवास करत होते. कमर्शियल पायलट लायसन्ससाठी (Commercial Pilot License) आवश्यक असलेले विशिष्ट उड्डाणाचे तास पूर्ण करण्यासाठी दोन्ही विद्यार्थ्यांनी हे विमान भाड्याने घेतले होते, अशी माहिती हार्व्ह्स एअरचे अध्यक्ष ॲडम पेनर यांनी दिली. रात्रीच्या वेळी देशांतर्गत प्रवास करत असताना हा अपघात घडला. सेंट्रल डेलाईट टाईमनुसार (CDT) सकाळी 10.30 वाजेपर्यंत विमान नियोजित ठिकाणी न पोहोचल्याने संशय बळावला आणि कॅनडाच्या वाहतूक सुरक्षा मंडळाला याविषयी तत्काळ सूचित करण्यात आले.
The Consulate General of India, Vancouver, expresses its deepest condolences on the tragic demise of Shri Manoj Sivakumar and Shri Srisaran Thirugnanasambantham, two Indian students from Tamil Nadu and Puducherry, who lost their lives in a tragic air accident in Canada during their flight training. Our heartfelt sympathies are with their bereaved families and loved ones during this difficult time. The Consulate stands ready to extend all possible consular assistance to the families in connection with the repatriation of the mortal remains to India. May the departed souls rest in peace. @MEAIndia @HCI_Ottawa @CPVIndia @diaspora_india @PIB_India @DDNewslive — India in Vancouver (@cgivancouver) September 20, 2026
हेही वाचा – Nila Vikhe Patil: स्वीडनच्या संसदेत घुमणार महाराष्ट्राचा आवाज! विखे-पाटलांची कन्या ‘रिक्सदाग’मध्ये खासदार
सायंकाळी 6 वाजता सुरु झालेल्या शोधमोहिमेत मृतदेह हाती
सुरक्षा यंत्रणांनी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास अपघातग्रस्त क्षेत्रात व्यापक शोध आणि बचाव कार्य सुरू केले, जिथे विमानाचा सांगडा आणि दोन्ही वैमानिकांचे मृतदेह आढळून आले. या दुर्घटनेचे मूळ कारण काय होते आणि तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला का, याबाबत कॅनडातील स्थानिक प्रशासनाकडून सखोल तपास सुरू आहे. दरम्यान, कॅनडामधील वृत्तसंस्था सीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, या भागात अशाच प्रकारच्या अपघाताची नोंद झाली असून पोलीस व सुरक्षा अधिकारी अधिक तपास करत आहेत.
भारतीय दूतावासाकडून दुःख व्यक्त; पार्थिव भारतात आणण्यासाठी मदत
व्हँकुव्हर येथील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर (ट्विटर) पोस्ट शेअर करत या दुर्दैवी घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. दूतावासाने शोकाकुल कुटुंबीयांप्रती संवेदना प्रकट करत, मृत विद्यार्थ्यांचे पार्थिव लवकरात लवकर भारतात त्यांच्या घरी पाठवण्यासाठी सर्वतोपरी कायदेशीर व प्रशासकीय मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेमुळे कॅनडामध्ये विमान उड्डाणाचे प्रशिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.