आई पिल्लाला वाचवण्यासाठी 5 सिंहांशी लढली; आता ती थकणार असं वाटलं.. इतक्यात आला ‘व्टिस्ट’

म्हशीच्या रेडकावर सिंहीण आपल्या बछड्यासोबत हल्ला करताना या व्हिडिओत दिसते. म्हैसही चपळाईने पिल्लाला वाचवू लागते. पण इतक्या सिंहांसमोर एकटीची ताकद कितीशी पुरणार असे वाटू लागते. पण थोड्याच वेळात..

आई पिल्लाला वाचवण्यासाठी 5 सिंहांशी लढली; आता ती थकणार असं वाटलं.. इतक्यात आला ‘व्टिस्ट’

Buffalo Vs Lions Video: जंगलात ताकद सत्ता गाजवते. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सिंहांचा एक गट एका म्हशीच्या रेडकावर हल्ला करताना दिसत आहे. पण त्याची आई हार मानत नाही. ती एकटी 4-5 सिंहांशी लढते. जेव्हा या दोघांच्या भोवती सिंहांचा वेढा पडतो, तेव्हा आता हे दोघे सिंहांच्या भक्ष्यस्थानी पडणार की काय, असे वाटू लागते आणि पाहणाऱ्याची धडधड वाढू लागते. पुढे काय होते..?

जर, तुम्हाला विचारले की, जंगलातील सर्वात धोकादायक प्राणी कोण आहे, तर तुम्ही कदाचित ‘सिंह’ असे नाव घ्याल. तो स्वतःपेक्षाही मोठ्या भक्ष्यावर झडप घालतो आणि एकदा त्याच्या तावडीत सापडला की कोणालाही पळून जाणे अशक्य होते. पण… तुम्ही कधी सिंहाला हरताना पाहिले आहे का?

हेही वाचा – माकडा माकडा हुप.. वाघाला बसवलं चूप! पाहा माकडाची शिकार करायला गेलेल्या वाघाची फजिती, पाहा VIDEO

आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडिओ दाखवणार आहोत, ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हा दुर्मीळ क्षण केनियातील रोंगाई येथे कैद झाला आणि डेनिस कोशल यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. आतापर्यंत हा व्हिडिओ 58.3 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

सिंहांच्या कळपाने एका वासरावर हल्ला केला
या व्हिडिओमध्ये एक सिंहीण तिच्या पिलांसह शिकार करायला बाहेर पडल्याचे दिसून येते. मग एका लहान सिंहाची म्हशीच्या रेडकावर नजर पडते आणि तो त्याला पकडतो. हे पाहून बाकीच्या म्हशी घाबरून पळून जातात.. 

आपलं मूल सिंहाच्या तावडीत सापडलंय हे पाहून रेडकाची आई हार मानणारी नव्हती. ती पूर्ण ताकदीने परतते आणि एकट्याने सिंहांवर हल्ला करते. ती तिच्या शिंगांनी त्यापैकी सिंहाच्या बछड्यांना दोन-तीन वेळा फेकूनही देते. सिंहीण आणि तिची पिल्ले अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मागे हटतात, पण तरीही पुन्हा रेडकाला पकडण्याचे प्रयत्न सुरूच ठेवतात. तेव्हा आता म्हैस त्यांच्याशी लढून थकणार असे वाटू लागते.. पण मग कथेत एक ट्विस्ट येतो. 

अगदी याच वेळी म्हशींचा कळप येतो आणि मग सत्तेचा खरा खेळ सुरू होतो. म्हशींचा संपूर्ण कळप परत  आल्यानंतर मग ते सर्वजण एकत्र येऊन सिंहांना अशा प्रकारे हाकलून लावतात की, जंगलातील सर्वात शक्तिशाली शिकारींना आपला जीव वाचवण्यासाठी पळून जावे लागते.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक भावुक झाले आहेत. एका युजरने कमेंट केली – मला वाटलं होतं की, रेडकाची आई एकटी काहीही करू शकणार नाही, पण सुदैवाने संपूर्ण कळप तिच्यासोबत आला. दुसऱ्या एका युजरने लिहिले – हा व्हिडिओ आपल्याला आठवण करून देतो की एकटे आपण बलवान असू शकतो, परंतु एकत्रितपणे आपण अजिंक्य बनतो. काही जण म्हणाले, की आईच्या शक्तीसमोर सिंहांचा समूह काहीच नाही.

हेही वाचा – हृदयस्पर्शी! एका वडिलांची पोस्ट व्हायरल; ‘हे मुलींचे संगोपन नाहीये, ही तर शांती ठेवून क्रांती आहे…’

हा व्हिडिओ केवळ जंगलातील घटना नाही तर, जीवनाचा आरसा आहे. यावरून दिसून येते की प्रेम ही केवळ एक भावना नाही, तर ती एक अफाट शक्ती आहे… आणि एकता ही अशी ढाल आहे जी सर्वात मोठ्या अडचणींनाही निष्प्रभ करू शकते.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number