Ammonia Gas Leak: मोठी बातमी! सी-फूड कारखान्यात अमोनिया वायू गळतीमुळे 7 महिलांचा मृत्यू; 67 कामगार रुग्णालयात दाखल

पोलिसांच्या माहितीनुसार, या विषारी वायूच्या संपर्कात आल्यामुळे कारखान्यात काम करणाऱ्या 7 महिला कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Ammonia Gas Leak: मोठी बातमी! सी-फूड कारखान्यात अमोनिया वायू गळतीमुळे 7 महिलांचा मृत्यू; 67 कामगार रुग्णालयात दाखल

Ammonia Gas Leak: तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यातील पेरियापालयमजवळील मंजांगरणई येथे एका खाजगी सी-फूड (समुद्री खाद्यपदार्थ) प्रक्रिया कारखान्यात अमोनिया वायूची भीषण गळती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वायू गळती सुरू होताच कारखान्यातील कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यांची प्रकृती वेगाने बिघडली. पोलिसांच्या माहितीनुसार, या विषारी वायूच्या संपर्कात आल्यामुळे कारखान्यात काम करणाऱ्या 7 महिला कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर इतर 67 बाधितांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चेन्नईहून NDRF चे विशेष पथक घटनास्थळी दाखल
घटनेचे गांभीर्य ओळखून तिरुवल्लूर जिल्हाधिकारी कार्यालयाने त्वरित अरक्कोनम येथील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) 4 थ्या बटालियनच्या मुख्यालयाशी संपर्क साधला. वरिष्ठ कमांडंट अखिलेश कुमार यांच्या आदेशानुसार, रासायनिक आणि जैविक आपत्ती निवारणात (CBRN) पारंगत असलेल्या विशेष पथकाला तात्काळ पाचारण करण्यात आले. चेन्नईहून 30 जवानांचे हे विशेष बचाव पथक पीपीई (PPE) किट, वायू शोधणारी अत्याधुनिक यंत्रे आणि आवश्यक बचाव साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले असून, सध्या तिथे युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून मदतकार्याचा आढावा; चौकशीचे आदेश
जिल्हाधिकारी एस. कविता यांनी घटनास्थळाला आणि रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाधित 67 कामगारांपैकी 46 जणांवर 'वेल्स हॉस्पिटल'मध्ये तर 21 जणांवर 'वेंकटेश्वर हॉस्पिटल'मध्ये उपचार सुरू आहेत. यातील अत्यंत गंभीर प्रकृती असलेल्या 9 रुग्णांना पुढील उपचारासाठी चेन्नईच्या सरकारी स्टॅनली मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. कारखान्यातील वाल्व नेमका कसा निकामी झाला आणि सुरक्षा व्यवस्थेत काय त्रुटी होत्या, याचा सखोल तपास करण्यासाठी प्रशासनाने अधिकृत चौकशीचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा – Indian Oil Tankers: इराणकडून होर्मुझ पुन्हा बंद; घोषणा होताच भारताचे 'इतकी' जहाजं सुरक्षित बाहेर

बाधितांमध्ये तरुण महिलांची संख्या अधिक; डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत
एका खाजगी रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या 44 रुग्णांमध्ये 43 तरुणी आणि 1 पुरुषाचा समावेश आहे. यातील 15 ते 16 रुग्णांच्या श्वसननलिकेत नळी (Intubate) टाकण्यात आली असून, 11 रुग्ण सध्या व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. बाधित कर्मचाऱ्यांचे वय खूप कमी असून, त्यातील बहुतांश महिला 24 ते 25 वयोगटातील आहेत. सध्या या रुग्णांचा रक्तदाब अतिशय कमी असला, तरी त्या तरुण असल्याने उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकर बऱ्या होतील, अशी आशा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number