Indian Students in US : कायद्यांचे उल्लंघन केल्यास थेट हकालपट्टी; भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकन दूतावासाचा कडक इशारा

अमेरिकेत सध्या विद्यार्थी व्हिसासंबंधी नियम कडक करण्यात आले आहेत. दूतावासाने आपल्या संदेशात असे म्हटले आहे की, 'यूएस व्हिसा हा एका विशिष्ट फायद्यासाठी दिला जातो, तो तुमचा हक्क नाही.'

Indian Students in US : कायद्यांचे उल्लंघन केल्यास थेट हकालपट्टी; भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकन दूतावासाचा कडक इशारा

US Embassy Warns Indian Students : अमेरिकेत शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी तेथील दूतावासाने अत्यंत कडक शब्दांत इशारा जारी केला आहे. अमेरिकन दूतावासाने ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करत स्पष्ट केले आहे की, जर कोणत्याही विद्यार्थ्याने अमेरिकेतील कायद्यांचे उल्लंघन केले किंवा त्याला कोणत्या कारणास्तव अटक झाली, तर त्याचा व्हिसा तातडीने रद्द केला जाऊ शकतो. केवळ व्हिसा रद्द होणेच नव्हे, तर संबंधित विद्यार्थ्याची अमेरिकेतून हकालपट्टी केली जाईल आणि भविष्यात त्याला पुन्हा कधीही अमेरिकन व्हिसासाठी अर्ज करता येणार नाही.

व्हिसा हा ‘हक्क’ नाही, तर ‘संधी’!
दूतावासाने आपल्या संदेशात असे नमूद केले आहे की, “यूएस व्हिसा हा एका विशिष्ट फायद्यासाठी दिला जातो, तो तुमचा हक्क नाही.” त्यामुळे नियमांचे पालन करणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांची जाणीव करून देत, विद्यार्थ्यांनी आपला शैक्षणिक प्रवास धोक्यात आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या नव्या भूमिकेमुळे अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या आणि नव्याने जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ट्रम्प प्रशासनाचे कडक धोरण आणि शुल्क वाढ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यांत व्हिसा नियमांमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. यामध्ये व्हिसा शुल्कात वाढ, विद्यार्थ्यांची सखोल सोशल मीडिया पडताळणी आणि वास्तव्याशी संबंधित कडक अटींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, 2024-25 या शैक्षणिक वर्षात अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत 10% वाढ झाली असतानाच हे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. यामुळे केवळ नोकरीसाठी जाणाऱ्यांवरच नव्हे, तर आता उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बजेटवर आणि मानसिकतेवरही मोठा परिणाम होणार आहे.

हेही वाचा – Pakistan Bangladesh Relations: भारताचा शत्रू देश पाकिस्तान आता बांग्लादेशच्या हवाई दलाला बळ देणार, काय आहे कारण?

H1B व्हिसाधारकांना वार्षिक 90 लाखांचा फटका
नोकरीसाठी अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी तर परिस्थिती अधिकच कठीण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसासाठी वार्षिक शुल्क 1,00,000 अमेरिकन डॉलर्स (अंदाजे 90 लाख रुपये) इतके प्रचंड केले आहे. प्रत्येक नवीन H1B व्हिसाधारकाला अमेरिकेत जाण्यापूर्वी ही मोठी रक्कम सरकारला वार्षिक शुल्क म्हणून द्यावी लागत आहे. या निर्णयामुळे मध्यमवर्गीय भारतीय तंत्रज्ञांसाठी अमेरिकेची द्वारे जवळपास बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

न्यायालयाचा ट्रम्प यांच्या निर्णयाला पाठिंबा
ट्रम्प यांच्या या कठोर निर्णयांविरुद्ध अमेरिकेतील जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नियुक्त केलेल्या एका न्यायाधीशाने या याचिकेवर सुनावणी करताना डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय योग्य असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. न्यायालयाच्या या पाठिंब्यामुळे आता ट्रम्प प्रशासनाचे हात अधिक बळकट झाले असून, येणाऱ्या काळात व्हिसा आणि स्थलांतरितांच्या नियमांमध्ये अधिक कडकपणा येण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा – Donald Trump : भारताच्या नेतृत्वाखालील सौर आघाडीसह 66 जागतिक संस्थांमधून अमेरिकेची माघार; डोनाल्ड ट्रम्पच्या निवेदनांवर स्वाक्षऱ्या

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number