श्रीनगर: गेल्या 48 तासांत जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे. पहलगाम येथे अलिकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. शनिवारी सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील कलारस भागात लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी फारुख अहमद तडवा याचे घर पाडले. फारुख सध्या पाकिस्तानात असून तेथून तो भारतात दहशतवादी कारवाया करत असल्याचं सांगण्यात येत आहे. एका मोठ्या स्फोटात त्याचे घर उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
फारुखच्या घराव्यतिरिक्त इतर दहशतवाद्यांच्या घरांनाही भारतीय जवानांनी लक्ष्य केलं आहे. यामध्ये अनंतनागमधील ठोकरपोरा येथील आदिल अहमद ठोकर, पुलवामा येथील मुररान येथील अहसान उल हक शेख, त्राल येथील आसिफ अहमद शेख, शोपियानमधील छोटीपोरा येथील शाहिद अहमद कुट्टे आणि कुलगाममधील मतलहामा येथील जाहिद अहमद गनी यांच्या घरांचा समावेश आहे.
हेही वाचा – कुलगाममध्ये लष्कर आणि सीआरपीएफची संयुक्त कारवाई; अतिरेक्यांना मदत करणाऱ्या दोघांना अटक
पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त –
पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्यांची घरे देखील यापूर्वी उद्ध्वस्त करण्यात आली. बेझबेहारा येथील आदिल हुसेन ठोकर यांचे घर आयईडीने उडवून देण्यात आले, तर त्रालमधील आसिफ शेख यांचे घर बुलडोझरने उद्ध्वस्त करण्यात आले. पहलगाम हल्ल्यात आदिल ठोकरने पाकिस्तानातील दहशतवाद्यांना मदत केल्याचे पोलिसांचे सांगितले. तो 2018 मध्ये अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानात गेला. त्याने तिथे दहशतवादी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर गेल्या वर्षी त्याने पुन्हा जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरी केली.
#BREAKING: India has just blasted the house of Lashkar e Tayyiba terrorist Farooq Ahmed Teedwa r/o Narikoot Kalaroos, Kupwara of North Kashmir. Farooq is currently in Pakistan and involved in working with Pakistan Army to kill innocent civilians in Kashmir. pic.twitter.com/pAgpSYC1l0 — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) April 26, 2025
हेही वाचा – पाकिस्तान चक्रावला; लाहोर विमानतळाला आग कुणी लावली?
अनंतनाग पोलिसांनी आदिल ठोकर आणि अली भाई आणि हाशिम मुसा या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक करण्यासाठी 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. यासोबतच, जनतेकडून माहिती मिळवता यावी म्हणून या दहशतवाद्यांचे रेखाचित्र देखील प्रसिद्ध करण्यात आले आहेत. सुरक्षा दलांनी पहलगाम आणि आसपासच्या जंगलात शोध मोहीम तीव्र केली आहे.