भारताला धमकी देणाऱ्या बिलावल भुट्टोंचा आता यू-टर्न; भारताकडे केली ‘ही’ मागणी

पाकिस्तान भारतासोबत शांतता चर्चा करण्यास तयार आहे, असं बिलावल भुट्टो यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी भुट्टो यांनी सिंधू पाणी करार स्थगित केल्यास रक्ताच्या नद्या वाहतील, अशी धमकी दिली होती. <br/>

भारताला धमकी देणाऱ्या बिलावल भुट्टोंचा आता यू-टर्न; भारताकडे केली ‘ही’ मागणी
Edited Image

इस्लामाबाद: भारताला धमकी देणारे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी आता यू-टर्न घेतला आहे. पाकिस्तान भारतासोबत शांतता चर्चा करण्यास तयार आहे, असं बिलावल भुट्टो यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी भुट्टो यांनी सिंधू पाणी करार स्थगित केल्यास रक्ताच्या नद्या वाहतील, अशी धमकी दिली होती. 
 
भारतासोबत शांतता चर्चेची मागणी – 

मंगळवारी पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभेत (संसद) भाषण करताना बिलावल भुट्टो म्हणाले, 'जर भारताला शांततेच्या मार्गावर जायचे असेल तर त्यांनी मुठी आवळून नव्हे तर उघड्या हातांनी यावे. त्यांनी तथ्यांसह यावे, बनावटी गोष्टींसह नाही. आपण शेजाऱ्यांसारखे बसून या विषयावर बोलूया.'

हेही वाचा – बगलिहार धरणाचं पाणी रोखलं; भारतानं आवळल्या पाकिस्तानच्या नाड्या

भारताने रद्द केला सिंधू पाणी करार – 

भारतासोबत शांततेबाबत बिलावल भुट्टो यांचे हे विधान 25 एप्रिल रोजीच्या त्यांच्या विधानानंतर आले आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, पाकिस्तानी लोक एकत्र येतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंधू पाणी करार रद्द करण्याच्या निर्णयाला प्रतिउत्तर देतील.

हेही वाचा – पाकिस्तान थोबाडावर आपटला; संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाक एकाकी

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही शेजारी देशांमधील तणाव वाढला आहे. या हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने कडक भूमिका घेत पाकिस्तानविरुद्ध विविध भूमिका घेतल्या. भारताने पाकिस्तान बरोबरचा सिंधू पाणी करार रद्द केला असून आता पाकिस्तान युद्धाच्या भीतीने प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number