Jay Dudhane Engagement: ‘बिग बॉस’ फेम जय दुधाणेने उरकला साखरपुडा; मसुरीतील रोमँटिक प्रपोजलनंतर आता बांधणार लग्नगाठ

जयने त्याची दीर्घकाळाची मैत्रीण हर्षला पाटील हिच्यासोबत साखरपुडा (Engagement) उरकला असून, त्यांच्या या सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत.<br/>

Jay Dudhane Engagement: ‘बिग बॉस’ फेम जय दुधाणेने उरकला साखरपुडा; मसुरीतील रोमँटिक प्रपोजलनंतर आता बांधणार लग्नगाठ

Jay Dudhane Engagement: मराठी मनोरंजन विश्वातील 'फिटनेस आयकॉन' आणि 'बिग बॉस मराठी 3' मुळे घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता जय दुधाणे याच्या आयुष्याची नवी इनिंग सुरू झाली आहे. जयने त्याची दीर्घकाळाची मैत्रीण हर्षला पाटील हिच्यासोबत साखरपुडा (Engagement) उरकला असून, त्यांच्या या सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत.

मैत्रीचं रूपांतर प्रेमात अन् आता लग्नाची गाठ 

जय आणि हर्षला गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. या नात्याची अधिकृत कबुली जयनं मार्च महिन्यातच दिली होती. उत्तराखंडमधील मसुरीच्या निसर्गरम्य डोंगरदऱ्यांमध्ये जयनं अगदी फिल्मी स्टाईलनं गुडघ्यावर बसून हर्षलाला प्रपोज केलं होतं. तेव्हापासूनच चाहत्यांना त्यांच्या लग्नाचे वेध लागले होते. नुकताच अत्यंत मोजक्या मित्र-मंडळी आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत या जोडीचा साखरपुडा सोहळा दिमाखात पार पडला.

हेही वाचा – Gnyanada Ramtirthakar : ज्ञानदा रामतीर्थकरने उरकला साखरपुडा? नवरदेवाचे नाव गुलदस्त्यात

कोण आहे जयची 'बेटर हाफ' हर्षला पाटील?

जयची होणारी पत्नी हर्षला पाटील ही सोशल मीडियावरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. ती एक लोकप्रिय कंटेंट क्रिएटर आणि डिजिटल इन्फ्लुएन्सर असून इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. फॅशन आणि ट्रॅव्हल संदर्भातील तिच्या फोटोंना नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळते.

हेही वाचा – Ranjit Patil Death: मराठी कलाविश्वावर शोककळा ! 'जर तरची गोष्ट' नाटकाचे दिग्दर्शक रणजित पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

जय दुधाणेचा करिअरचा प्रवास थक्क करणारा आहे. MTV स्प्लिट्सविला 13 या शोचा विजेता ठरत जयनं संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण केली. बिग बॉस मराठी 3 या शोमध्ये तो उपविजेता (Runner-up) ठरला. त्याच्या आक्रमक खेळाने आणि फिटनेसने प्रेक्षकांना भुरळ घातली. 'वेड लागलं प्रेमाचं' ही मालिका आणि 'गडद अंधार' सारख्या चित्रपटांनंतर तो आता महेश मांजरेकर यांच्या मोठ्या ऐतिहासिक प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number