Bigg Boss 20: मनोरंजन विश्वात धुमाकूळ घालायला ‘बिग बॉस 20’ सज्ज; सलमान खान पुन्हा सांभाळणार सूत्रसंचालकाची धुरा

निर्मात्यांनी 'बिग बॉस 20' ची अधिकृत घोषणा करत शोच्या आयकॉनिक 'डोळ्याच्या' (Eye) लोगोचे नवीन रूप प्रेक्षकांसमोर आणले आहे.

Bigg Boss 20: मनोरंजन विश्वात धुमाकूळ घालायला ‘बिग बॉस 20’ सज्ज; सलमान खान पुन्हा सांभाळणार सूत्रसंचालकाची धुरा

Bigg Boss 20: छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि बहुप्रतिक्षित रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ आपल्या नवीन पर्वासह परतण्यासाठी सज्ज झाला आहे. निर्मात्यांनी ‘बिग बॉस 20’ ची अधिकृत घोषणा करत शोच्या आयकॉनिक ‘डोळ्याच्या’ (Eye) लोगोचे नवीन रूप प्रेक्षकांसमोर आणले आहे. बॉलीवूडचा ‘दबंग’ सलमान खान सलग 16 व्या सीझननंतर पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत सूत्रसंचालन करताना आणि स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहे, ज्यामुळे चाहत्यांमधील उत्साह द्विगुणित झाला आहे.

जिओ-हॉटस्टारवरही स्ट्रीमिंग 
कलर्स टीव्हीवर प्रसारित होणारा हा बहुचर्चित शो प्रेक्षकांना ‘जिओ-हॉटस्टार’ (JioHotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पाहता येणार आहे. अधिकृत प्रीमियरची तारीख अजून गुप्त ठेवली असली, तरीही सप्टेंबर 2026 मध्ये हा शो सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ‘दोन दशकांच्या प्रवासानंतरही हा शो तितकाच आयकॉनिक आहे,’ अशी पोस्ट शेअर करत जिओ-हॉटस्टारने या नवीन पर्वाची घोषणा केली आहे.

सोशल मीडियावर चाहत्यांची उत्सुकता शिगेला
नवीन लोगो प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पूर आला आहे. ‘रिअॅलिटी शोचा खरा राजा परततोय!’ अशा शब्दांत युजर्स आपला आनंद व्यक्त करत आहेत. यंदाच्या सीझनमध्ये कोणते प्रसिद्ध चेहरे आणि सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून सहभागी होणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा – Suraj Chavan Post: ‘देवाला पाहिलं नाही, पण अजितदादांच्या रुपात…’; अजित पवारांच्या पहिल्या शासकीय जयंतीला सूरज चव्हाणची भावूक पोस्ट 

इतिहासात पहिल्यांदाच 6 भाषांमध्ये एकाच वेळी प्रसारण 
यंदाचे ‘बिग बॉस 20’ चे पर्व अत्यंत भव्यदिव्य असणार आहे, कारण इतिहासात पहिल्यांदाच हा शो एकाच वेळी 6 भाषांमध्ये (हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि बंगाली) सुरू होणार आहे. हिंदीसाठी सलमान खान, तमिळसाठी विजय सेतुपती, तेलगूसाठी नागार्जुन, कन्नडसाठी किच्चा सुदीप आणि मल्याळमसाठी मोहनलाल सूत्रसंचालन करतील. विशेष म्हणजे, बंगाली आवृत्तीच्या सूत्रसंचालनाची कमान भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली सांभाळणार आहे.

गेल्या सीझनचा विजेता गौरव खन्ना अन् वैयक्तिक आयुष्यातील वादळ
दरम्यान, ‘बिग बॉस 19’ चा ग्रँड फिनाले 7 डिसेंबर 2025 रोजी पार पडला होता, ज्याचे विजेतेपद अभिनेता गौरव खन्ना याने पटकावले होते. सध्या गौरव खन्ना त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. त्याची पत्नी आकांक्षा चमोला हिने ‘लॉक अप 2’ या शोमध्ये त्यांच्या घटस्फोटाचा खुलासा केला होता. त्यानंतर गौरवनेही त्या शोमध्ये हजेरी लावून आकांक्षाला जाब विचारल्यामुळे हे जोडपे सध्या माध्यमांमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number