Railway New Rule: रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा, आता स्टेशन चुकण्याची भीती संपली; IRCTC ने सुरू केली ‘ही’ खास सेवा

रेल्वेने या सुविधेसाठी अत्यंत नाममात्र शुल्क आकारण्याचे ठरवले आहे. साधारणपणे 3 ते 10 दरम्यान असणारे हे शुल्क तुमच्या मोबाईल बॅलन्समधून कापले जाईल.

Railway New Rule: रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा, आता स्टेशन चुकण्याची भीती संपली; IRCTC ने सुरू केली ‘ही’ खास सेवा

Railway New Rule:  रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि सोयीस्कर सुविधा आणली आहे. अनेकदा रात्रीच्या प्रवासात गाढ झोप लागल्यामुळे प्रवासी आपले स्टेशन चुकवतात. मात्र, आता IRCTC च्या नवीन 'डेस्टिनेशन अलर्ट आणि वेक-अप अलार्म' (Destination Alert & Wake-up Alarm) तंत्रज्ञानामुळे ही चिंता कायमची मिटणार आहे. रेल्वेने प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि तणावमुक्त करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

स्टेशन येण्यापूर्वी 20 मिनिटे आधी वाजणार अलार्म
या सेवेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची अचूकता. तुमची ट्रेन तुमच्या निर्धारित स्थानकावर पोहोचण्याच्या 20 मिनिटे आधी तुमच्या मोबाईलवर आपोआप एक अलार्म वाजेल. हे वैशिष्ट्य विशेषतः रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांसाठी वरदान ठरणार आहे. यामुळे प्रवाशांना आता रात्री वारंवार जागे होऊन खिडकीबाहेर पाहण्याची किंवा गुगल मॅप्स तपासण्याची गरज उरणार नाही.

इंटरनेटशिवाय चालणारे प्रगत IVR तंत्रज्ञान
ही सेवा पूर्णपणे IVR (Interactive Voice Response) तंत्रज्ञानावर आधारित आहे. याचाच अर्थ असा की, तुमच्या फोनमध्ये इंटरनेट पॅक नसला तरीही ही सेवा विनाअडथळा काम करेल. अलार्म सेट करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवरून 139 या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करावा लागेल. त्यानंतर भाषा निवडून 'पर्याय 7' निवडावा लागेल आणि आपला 10 अंकी PNR नंबर टाकावा लागेल. नोंदणी यशस्वी झाल्यावर एक कन्फर्मेशन एसएमएस येईल आणि तुम्ही निर्धास्त झोप घेऊ शकाल.

हेही वाचा – JioFrames AI Glasses: रेकॉर्डिंगपासून भाषांतरापर्यंत चष्माचं करणार सर्वकाही; जिओने आणला स्वस्तात मस्त 'जिओफ्रेम्स' चष्मा

नाममात्र शुल्कात 'स्मार्ट' सुविधा
रेल्वेने या सुविधेसाठी अत्यंत नाममात्र शुल्क आकारण्याचे ठरवले आहे. साधारणपणे 3 ते 10 दरम्यान असणारे हे शुल्क तुमच्या मोबाईल बॅलन्समधून कापले जाईल. या सेवेचा फायदा असा की, यामुळे मोबाईलची बॅटरी वाचते कारण तुम्हाला डेटा ऑन ठेवण्याची गरज नसते. सुरक्षितता आणि सोय या दोन्ही दृष्टीने रेल्वेचा हा नवा नियम प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number