EPFO New Rules: नोकरदारांसाठी मोठी बातमी! आता फक्त 3 दिवसांत मिळणार PF चे पैसे; ‘ऑटो-सेटलमेंट’ची मर्यादा 5 लाखांवर

नव्या नियमांनुसार, सर्व निकष पूर्ण करणारे पीएफ दावे आता अवघ्या 3 दिवसांत निकाली काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

EPFO New Rules: नोकरदारांसाठी मोठी बातमी! आता फक्त 3 दिवसांत मिळणार PF चे पैसे; ‘ऑटो-सेटलमेंट’ची मर्यादा 5 लाखांवर

EPFO New Rules:  तुम्ही नोकरी करत असाल आणि तुम्हाला तातडीने पीएफ (भविष्य निर्वाह निधी) काढायचा असेल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया अतिशय वेगवान आणि सुटसुटीत केली आहे. नव्या नियमांनुसार, सर्व निकष पूर्ण करणारे पीएफ दावे आता अवघ्या 3 दिवसांत निकाली काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी 'ऑटो-सेटलमेंट' (स्वयंचलित प्रणाली) व्यवस्थेचा विस्तार करण्यात आला असून, मानवी हस्तक्षेपाशिवाय किंवा मॅन्युअल तपासणीशिवाय आता लाखो कर्मचाऱ्यांचे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

विलंब झाल्यास अधिकाऱ्यांना भरावे लागणार 12 टक्के व्याज
नव्या नियमावलीनुसार, कागदपत्रांची पूर्तता असणारे दावे 3 दिवसांत निकाली काढणे बंधनकारक असणार आहे. पूर्वी मॅन्युअल पडताळणीमुळे या प्रक्रियेला बराच वेळ लागत असे. मात्र, आता कोणत्याही ठोस कारणाशिवाय जर पीएफ क्लेम प्रक्रियेला 20 दिवसांपेक्षा जास्त उशीर झाला, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होऊ शकते. अशा विलंबासाठी जबाबदार अधिकाऱ्यांकडून 12 टक्के दराने दंडात्मक व्याज वसूल केले जाऊ शकते. कर्मचाऱ्यांना वेळेत पैसे मिळावेत आणि प्रशासकीय उत्तरदायित्व वाढावे, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. हा 3 दिवसांचा नियम केवळ अशाच कर्मचाऱ्यांना लागू होईल ज्यांची केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण आहे, ज्यांच्या खात्याची माहिती अचूक आहे आणि ज्यांच्या दाव्यात कोणतीही त्रुटी नाही. तपासणीची गरज असलेल्या क्लेम्सना पूर्वीप्रमाणेच वेळ लागू शकतो.

'ऑटो-सेटलमेंट'ची मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढवली
डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देत EPFO ने ऑटो-सेटलमेंटची मर्यादा आधीच्या 1 लाख रुपयांवरून थेट 5 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. याचा मोठा फायदा असा होईल की, 5 लाख रुपयांपर्यंतच्या पीएफ ॲडव्हान्स क्लेमसाठी आता कोणत्याही मॅन्युअल स्क्रुटिनीची गरज पडणार नाही. ही प्रणाली पूर्णपणे संगणकीकृत असल्याने कागदपत्रांचा गोंधळ कमी होईल आणि क्लेम रिजेक्ट होण्याचे प्रमाणही लक्षणीय घटेल.

हेही वाचा – EPFO Portal Resumed: PF खातेधारकांना मोठा दिलासा, तब्बल 1 आठवड्यानंतर EPFO चे पोर्टल अखेर सुरू; काय बदललं? जाणून घ्या

'या' कामांसाठी तातडीने मिळणार निधी
या महत्त्वपूर्ण बदलामुळे वैद्यकीय आणीबाणी, मुलांचे शिक्षण, विवाह, घर खरेदी किंवा बांधकाम आणि अचानक आलेली बेरोजगारी यांसारख्या संकटसमयी कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे अत्यंत वेगाने मिळतील. ज्या सदस्यांचे युएएन (UAN) हे बँक खाते आणि केवायसी तपशिलाशी अचूक जोडलेले आहे, त्यांचे क्लेम सर्वात आधी आणि सुपरफास्ट पद्धतीने सेटल केले जातील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number