EPFO New Rules: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! आता पेन्शन आणि क्लेमसाठी हेलपाटे बंद; EPFO आणणार ‘ही’ खास सुविधा

या नवीन प्रणालीमुळे कर्मचाऱ्याने नोकरी सोडल्यानंतर किंवा निवृत्त झाल्यानंतर, पीएफची रक्कम कोणत्याही अर्जाशिवाय थेट त्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

EPFO New Rules: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! आता पेन्शन आणि क्लेमसाठी हेलपाटे बंद; EPFO आणणार ‘ही’ खास सुविधा

EPFO New Rules: देशातील नोकरदार वर्गासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आता पीएफ (PF) दाव्यांचे अंतिम निवारण पूर्णपणे 'स्वयंचलित' (Automated) करण्याच्या तयारीत आहे. या नवीन प्रणालीमुळे कर्मचाऱ्याने नोकरी सोडल्यानंतर किंवा निवृत्त झाल्यानंतर, पीएफची रक्कम कोणत्याही अर्जाशिवाय थेट त्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यामुळे 7 कोटींहून अधिक खातेधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

7 कोटी खातेधारकांना मिळणार थेट लाभ
सध्या ईपीएफओमध्ये केवळ 5 लाख रुपयांपर्यंतच्या आगाऊ (Advance) दाव्यांची प्रक्रिया स्वयंचलित आहे. मात्र, आता अंतिम सेटलमेंटची प्रक्रियाही 'ऑटोमोड'वर आणली जात आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या सुविधेमुळे पीएफची रक्कम मिळवण्यासाठी होणारी दिरंगाई आणि कागदपत्रांचा त्रास संपणार आहे. आगामी काळात निवृत्त होणाऱ्या देशातील सुमारे 7 कोटी खातेधारकांना याचा थेट फायदा होणार असून, नोकरी सोडल्याबरोबर त्यांचे पैसे सुरक्षितपणे त्यांच्या खात्यात जमा होतील.

आता अर्ज भरण्याची कटकट संपणार
'ASSOCHAM' द्वारे आयोजित चर्चासत्रात बोलताना केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त रमेश कृष्णमूर्ती यांनी ही मोठी घोषणा केली. त्यांनी स्पष्ट केले की, नवीन प्रणाली अंतर्गत खातेधारकांना कंपनी बदलल्यानंतर पीएफ हस्तांतरण किंवा अंतिम दाव्यासाठी कोणताही अर्ज सादर करण्याची गरज भासणार नाही. पीएफ खात्यांचे स्वयंचलित हस्तांतरण आणि निवारण ही सुविधा लवकरच कार्यान्वित केली जाईल, ज्यामुळे कामगार वर्गाचा वेळ आणि कष्ट दोन्ही वाचणार आहेत.

तीन महत्त्वाच्या योजना पुन्हा अधिसूचित होणार
नवीन कामगार कायद्यांच्या चौकटीत बसवण्यासाठी ईपीएफओ तीन प्रमुख योजना पुन्हा अधिसूचित करणार आहे:

EPF योजना 1952
कर्मचारी ठेव संलग्न विमा योजना 1976 (EDLI)
कर्मचारी निवृत्तीवेतन योजना 1995 (EPS)

'केंद्रीय विश्वस्त मंडळा'ने (CBT) या तिन्ही योजना पुन्हा सुरू करण्याबाबत आणि त्यांना अधिक आधुनिक करण्याबाबत एकमत साधले आहे.

हेही वाचा – RBI Warning: महागाईचा भडका उडणार! पेट्रोल-डिझेल महागणार? RBI चा धोक्याचा इशारा; 48 तासांतील 3 मोठ्या निर्णयाने खळबळ

EPFO 3.0: आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार पैसे
ईपीएफओ तंत्रज्ञानाच्या बाबतीत एक पाऊल पुढे टाकत असून 'EPFO 3.0' प्रकल्पांतर्गत नवीन सुविधा सुरू करणार आहे. या महिन्याच्या अखेरीस खातेधारकांना ATM आणि UPI द्वारे पीएफची रक्कम काढण्याची सुविधा मिळण्याची शक्यता आहे. यासाठी ईपीएफओ खास एटीएम कार्ड्स जारी करू शकते. यामुळे पीएफ कार्यालयात न जाता किंवा कोणत्याही कागदपत्रांशिवाय खातेधारकांना तातडीच्या गरजेसाठी पैसे काढणे सोपे होईल. या सर्व सुविधांमुळे ईपीएफओची कार्यप्रणाली अधिक पारदर्शक आणि गतिमान होणार असून, 7 कोटी भारतीयांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याची आर्थिक सुरक्षा अधिक बळकट होणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number