BPCL 10 kg LPG Cylinder: सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची तेल कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनी 15 ऑगस्ट पासून देशातील 24 राज्यांतील 100 प्रमुख शहरांमध्ये 10 किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर उपलब्ध करून देणार आहे. कमी गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी तसेच 14.2 किलो चा सिलेंडर खरेदी करणे परवडत नसलेल्या कुटुंबांसाठी हा पर्याय फायदेशीर ठरणार आहे. विशेषतः लहान कुटुंबे, विद्यार्थी, नोकरदार आणि एकटे राहणाऱ्या नागरिकांना हा हलका सिलेंडर सहज हाताळता येणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.
रशियाकडून 38 टक्के कच्च्या तेलाची आयात
जून तिमाहीत बीपीसीएलने कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी विविध पर्यायांवर भर दिला आहे. कंपनीने आपल्या एकूण गरजेपैकी 38 टक्के कच्चे तेल थेट रशियाकडून आयात केले आहे. तसेच खुल्या बाजारातील खरेदी वाढवून 69 टक्के पर्यंत नेली असून, व्हेनेझुएला आणि अंगोला येथूनही आयात वाढवण्यात आली आहे. कंपनीकडे सध्या 3.8 दशलक्ष मेट्रिक टन (38 लाख टन) कच्च्या तेलाचा साठा असून, तो पुढील 35 दिवसांची गरज पूर्ण करण्यास पुरेसा असल्याचे कंपनीने सांगितले.
जून तिमाहीत 1.51 लाख कोटी रुपयांचा महसूल
आर्थिक कामगिरीबाबत बोलायचे झाल्यास, जून तिमाहीत बीपीसीएलने 1.51 लाख कोटी रुपयांचा महसूल नोंदवला. या कालावधीत जागतिक घडामोडींमुळे कंपनीला 3962 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला असला, तरी हा तोटा बाजारातील अंदाजापेक्षा कमी राहिला. त्यामुळे अनेक ब्रोकरेज संस्थांनी कंपनीच्या शेअरबाबत सकारात्मक भूमिका कायम ठेवली आहे.
A progressive India begins with smarter homes. That's why BPCL brings you BharatGas Lite Zip, an easier, faster and smarter way to get your LPG connection. No paperwork. No waiting. Just Zip Connection, instant delivery, a lightweight cylinder and a gas level indicator that… pic.twitter.com/iQIu1C9LsL — Bharat Petroleum (@BPCLimited) July 24, 2026
दरम्यान, जागतिक बाजारातील इंधनाच्या किमतीतील चढ-उतार लक्षात घेता, ग्राहकांना अधिक सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी 10 किलो चा नवीन एलपीजी सिलेंडर बाजारात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.