Gold Silver Price: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल 6800 रुपयांनी तर सोने 1600 रुपयांनी स्वस्त, पाहा आजचे ताजे भाव

अमेरिकन डॉलरची वाढलेली ताकद आणि 'यूएस फेडरल रिझर्व्ह'कडून व्याजदरात वाढ होण्याची निर्माण झालेली दाट शक्यता, या जागतिक घडामोडींमुळे सोने-चांदीचे भाव दबावाखाली आले आहेत.

Gold Silver Price: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल 6800 रुपयांनी तर सोने 1600 रुपयांनी स्वस्त, पाहा आजचे ताजे भाव

Gold Silver Price: सोने आणि चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. मंगळवारी देशांतर्गत फ्युचर्स मार्केटमध्ये (वायदा बाजार) दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. अमेरिकन डॉलरची वाढलेली ताकद आणि 'यूएस फेडरल रिझर्व्ह'कडून व्याजदरात वाढ होण्याची निर्माण झालेली दाट शक्यता, या जागतिक घडामोडींमुळे सोने-चांदीचे भाव दबावाखाली आले आहेत. या घसरणीत चांदीला मोठा फटका बसला असून, एकाच दिवसात चांदीच्या दरात प्रति किलो सुमारे 6,800 रुपयांची घसरण झाली आहे.

एमसीएक्स (MCX) बाजारातील ताजी स्थिती
'मल्टी कमोडिटी एक्सचेंज' (MCX) वर सोन्याचे दर 1,760 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅमसाठी 1,46,566 रुपयांवर आले आहेत. दुसरीकडे, चांदीचा व्यापार प्रति किलो 2,27,622 रुपयांवर झाला असून त्यात तब्बल 7,010 रुपयांची घट नोंदवली गेली. बाजारातील जाणकारांच्या मते, अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी आणि अनपेक्षित घसरण मानली जात आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर
सध्या देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये 24-कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 14,650 ते 14,850 रुपयांच्या दरम्यान आहे. राजधानी दिल्लीमध्ये 24-कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम सुमारे 14,667 रुपये, तर मुंबईत तो 14,652 रुपयांच्या आसपास स्थिरावला आहे. चेन्नईमध्ये हाच दर प्रति ग्रॅम 14,836 रुपये इतका आहे. याशिवाय, बहुतांश शहरांमध्ये 22-कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम सुमारे 13,400 रुपये आणि 18-कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 11,000 रुपयांच्या आसपास आहे.

क्रूड ऑइल स्वस्त होऊनही सोने का घसरले?
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या अहवालानुसार, अमेरिका आणि इराण यांच्यातील सकारात्मक चर्चेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (ब्रेंट क्रूड) किमतीत घसरण झाली आहे. मात्र, तरीही सोन्यातील गुंतवणूकदारांचा उत्साह वाढलेला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे, 'यूएस फेडरल रिझर्व्ह'सह जगातील प्रमुख मध्यवर्ती बँका आगामी काळात व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. यामुळे 'डॉलर इंडेक्स' 101 च्या पातळीवर पोहोचला असून, ही गेल्या वर्षभरातील सर्वोच्च पातळी आहे. डॉलर मजबूत झाल्याने परदेशी गुंतवणूकदारांसाठी सोने खरेदी करणे महाग होते आणि त्यामुळे त्याची मागणी घटते. त्यातच 'गोल्ड ईटीएफ'मधून (Gold ETFs) गुंतवणूकदार सातत्याने पैसे काढून घेत असल्याने बाजारात सावधगिरीचे वातावरण आहे.

हेही वाचा – 8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA चे बदलणार गणित; वेतनात मोठ्या वाढीची शक्यता, काय आहेत 5 मुख्य मागण्या?

गुंतवणूकदारांसाठी खरेदीची उत्तम संधी
बाजार तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, नजीकच्या काळात सोन्याच्या किमतींवर हा दबाव असाच राहू शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव प्रति औंस 4,000 डॉलर्स किंवा त्याहून खाली जाऊन 3,800 डॉलर्सची पातळी देखील गाठू शकतात. मात्र, दीर्घकालीन गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी ही घसरण एक सुवर्णसंधी मानली जात आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार सोन्यासाठी 4,250, 4,300 आणि 4,400 डॉलर्स या अत्यंत महत्त्वाच्या 'रेझिस्टन्स लेव्हल्स' असतील.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number