Maruti Suzuki Car Price Hike: कार खरेदीदारांना मोठा झटका; मारुती सुझुकीच्या गाड्या महागणार; किमतीत ‘इतक्या’ रुपयांपर्यंत वाढ

ऑगस्ट 2026 पासून कंपनीच्या विविध गाड्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतील.

Maruti Suzuki Car Price Hike: कार खरेदीदारांना मोठा झटका; मारुती सुझुकीच्या गाड्या महागणार; किमतीत ‘इतक्या’ रुपयांपर्यंत वाढ

Maruti Suzuki Price Hike: देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी 'मारुती सुझुकी' (Maruti Suzuki) आपल्या चारचाकी वाहनांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहे. ऑगस्ट 2026 पासून कंपनीच्या विविध गाड्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतील. वाहनांच्या किमतींमध्ये तब्बल 30,000 रुपयांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गाड्यांच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

ऑगस्ट 2026 पासून नवे दर लागू होणार
कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, दरवाढीचे हे नवीन दर ऑगस्ट 2026 पासून अधिकृतपणे अमलात आणले जातील. ही भाववाढ मारुतीच्या सर्वच मॉडेल्सवर लागू होणार असली, तरी प्रत्येक मॉडेल आणि त्याच्या व्हेरिएंटनुसार वाढीचे प्रमाण वेगवेगळे असेल. त्यामुळे येत्या काळात नवीन कार खरेदीचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांच्या बजेटवर याचा थेट परिणाम होणार आहे.

लहान गाड्यांपासून SUV पर्यंत दरवाढीचा प्रभाव
मारुती सुझुकीच्या ताफ्यातील अगदी सुरुवातीच्या बजेट कार्सपासून ते प्रीमियम श्रेणीतील SUVs पर्यंत सर्वच गाड्यांच्या किमती वाढणार आहेत. ग्राहकांना कमाल 30,000 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त भार सहन करावा लागू शकतो. कंपनीने अद्याप मॉडेलनुसार नेमकी किती वाढ होणार, याची सविस्तर यादी जाहीर केली नसून ती लवकरच प्रसिद्ध केली जाईल.

हेही वाचा – RajmargYatra App : NHAI च्या 'राजमार्गयात्रा' ॲपवर आता 'डिजिटल लोकल पास'; सोबत 'मार्गमित्र हेल्प सेंटर'चीही मिळणार सुविधा

उत्पादन खर्चातील वाढीमुळे निर्णय घेणे भाग
गेल्या काही महिन्यांपासून कच्च्या मालाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहनांच्या निर्मितीचा खर्च कमालीचा वाढला आहे. कंपनीने अंतर्गत पातळीवर खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या; मात्र महागाईचा दबाव वाढल्याने अखेर दरवाढीचा मार्ग स्वीकारावा लागला. ग्राहकांवर या वाढीचा शक्य तितका कमी प्रभाव पडावा यासाठी उत्पादन खर्चातील केवळ काही भागच ग्राहकांवर टाकला असल्याचे मारुती सुझुकीने नमूद केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number