Income Tax Return: सावधान! ITR भरताना ‘ही’ चूक करताय? 200 टक्के दंडासह थेट खावी लागू शकते तुरुंगवासाची हवा

तात्पुरता कर वाचवण्यासाठी हा मार्ग सोपा वाटत असला, तरी प्राप्तिकर कायद्यानुसार (Income Tax Act) याचे परिणाम अतिशय गंभीर होऊ शकतात.

Income Tax Return: सावधान! ITR भरताना ‘ही’ चूक करताय? 200 टक्के दंडासह थेट खावी लागू शकते तुरुंगवासाची हवा

Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यास सुरुवात झाली असून अनेक करदाते आपला कर वाचवण्यासाठी विविध मार्ग शोधू लागतात. यादरम्यान, काही जण आवश्यक कागदपत्रे नसताना किंवा बनावट बिले व खोट्या पावत्या सादर करून कर सवलती मिळवण्याचा प्रयत्न करतात. तात्पुरता कर वाचवण्यासाठी हा मार्ग सोपा वाटत असला, तरी प्राप्तिकर कायद्यानुसार (Income Tax Act) याचे परिणाम अतिशय गंभीर होऊ शकतात. कर चोरी किंवा उत्पन्नाची चुकीची माहिती दिल्यास करदात्यांना केवळ मोठा आर्थिक दंडच भरावा लागत नाही, तर फौजदारी खटला आणि थेट तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. त्यामुळे ITR भरताना कोणत्या चुका टाळायला हव्यात, हे समजून घेणे आवश्यक आहे.

काय आहे कलम 270A आणि कधी आकारला जातो मोठा दंड?

प्राप्तिकर कायद्यातील कलम 270A अंतर्गत 'कमिशनर' यांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या करदात्यांवर दंड लावण्याचे कायदेशीर अधिकार आहेत. एखाद्या करदात्याने आपले उत्पन्न लपवले (Under-reporting) किंवा चुकीची माहिती सादर केली (Misreporting), तर हा दंड आकारला जातो. केलेल्या चुकीच्या गांभीर्यनुसार, लपवलेल्या उत्पन्नावरील कराच्या किमान 50 टक्के पासून ते कमाल 200 टक्के पर्यंत हा दंड असू शकतो.

उत्पन्नाची कमी नोंद म्हणजे नक्की काय?

कलम 270A नुसार खालील बाबींचा समावेश उत्पन्नाच्या कमी नोंदीत केला जातो:

उत्पन्नाचा एखादा भाग हिशोबाच्या पुस्तकात किंवा आयटीआर विवरणपत्रात जाहीर न करणे.

प्राप्तिकर विभागाने निश्चित केलेले वास्तविक उत्पन्न, करदात्याने घोषित केलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त असणे.

मूलभूत कर-सवलत मर्यादेपेक्षा (Basic exemption limit) जास्त उत्पन्न असतानाही आयटीआर (ITR) दाखल न करणे.

सामान्य तरतुदींनुसार काढलेले उत्पन्न, कलम 115JB किंवा 115JC च्या विशेष तरतुदींनुसार मोजलेल्या उत्पन्नापेक्षा अधिक असणे.

उत्पन्नाची चुकीची माहिती देणे  

जाणीवपूर्वक चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती देणे हा अधिक गंभीर गुन्हा मानला जातो. कलम 270A नुसार खालील गोष्टींना 'उत्पन्नाचे चुकीचे सादरीकरण' मानले जाते:

– महत्त्वाचे तथ्य चुकीच्या पद्धतीने मांडणे किंवा ते पूर्णपणे लपवून ठेवणे.
– केलेल्या गुंतवणुकीची नोंद हिशोबाच्या पुस्तकात न करणे.
-कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय किंवा कागदपत्रांशिवाय खर्चाचा दावा करणे.
-हिशोबाच्या पुस्तकांमध्ये खोट्या किंवा बनावट नोंदी दाखवणे.
-मिळालेल्या उत्पन्नाची (प्राप्तीची) नोंद हिशोबात न करणे.
– आंतरराष्ट्रीय व्यवहार किंवा 'डीम्ड' आंतरराष्ट्रीय व्यवहारांची माहिती लपवणे.

हेही वाचा – Stock Market Closing: दलाल स्ट्रीटवर भूकंप! अमेरिका-इराण तणावामुळे सेन्सेक्स 560 हून अधिक अंकांनी कोसळला

बनावट कागदपत्रांचा वापर केल्यास थेट कारावासाची शिक्षा

कर क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, कर वाचवण्यासाठी जर बनावट व बनावट कागदपत्रांचा आधार घेतला गेला, तर ते प्रकरण केवळ कराच्या वादापुरते मर्यादित राहत नाही. प्राप्तिकर कायद्यांतर्गत या कृतीला थेट फौजदारी गुन्हा मानले जाते आणि अशा प्रकरणांमध्ये कायद्यातील कठोर कलमांनुसार थेट तुरुंगवासाची कारवाई केली जाऊ शकते.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number