Khashaba Teaser: मातीतील लढाई, अजय-अतुलचं संगीत… नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’चा जबरदस्त टीझर रिलीज; पाहा व्हिडीओ

'सैराट' आणि 'फॅन्ड्री' सारख्या जागतिक पातळीवर गाजलेल्या कलाकृतींनंतर, प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे एका अत्यंत प्रेरणादायी आणि ऐतिहासिक कथेसह रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहेत.

Khashaba Teaser: मातीतील लढाई, अजय-अतुलचं संगीत… नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’चा जबरदस्त टीझर रिलीज; पाहा व्हिडीओ

Khashaba Teaser: भारतीय सिनेसृष्टीत ‘धुरंधर’, ‘धुरंधर : द रिव्हेंज’ आणि ‘राजा शिवाजी’ यांसारख्या सलग सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या जिओ स्टुडिओजने आता एका नवीन भव्य प्रकल्पाची घोषणा केली आहे. ‘सैराट’ आणि ‘फॅन्ड्री’ सारख्या जागतिक पातळीवर गाजलेल्या कलाकृतींनंतर, प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे एका अत्यंत प्रेरणादायी आणि ऐतिहासिक कथेसह रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहेत. त्यांच्या ‘खाशाबा’ या आगामी सिनेमाचा टीझर आधी चित्रपटगृहात आणि आता डिजिटल माध्यमांवर प्रदर्शित करण्यात आला असून, त्याला रसिक प्रेक्षकांकडून प्रचंड पसंती मिळत आहे. या टीझरमधील मातीतील कुस्तीची दृश्ये, थक्क करणारा सिनेमॅटिक अनुभव आणि संघर्षाची तीव्रता प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करत आहे.

ऑलिम्पिक विजेत्या खाशाबा जाधवांचा ऐतिहासिक लढा मोठ्या पडद्यावर
हा चित्रपट नवोदित भारताच्या काळातील असून, महाराष्ट्रातील एका जिद्दी मल्लाची यशोगाथा यात मांडण्यात आली आहे. स्वतंत्र भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे थोर कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनावर हा पट आधारित आहे. सर्व आव्हानांवर मात करत त्यांनी 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकून देशाचे नाव सुवर्णअक्षरांनी कोरले होते. हा गौरवशाली इतिहास मोठ्या पडद्यावर आणणारा ‘खाशाबा’ हा प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील आजवरचा सर्वात मोठा स्पोर्ट्स-ड्रामा ठरू शकतो.

हेही वाचा – Vijaya Mehta : मराठी रंगभूमी पोरकी झाली…, अनेक दिग्गजांना घडवणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि अभिनेत्री विजया मेहता यांचे निधन

दिग्गज स्टारकास्ट आणि मुख्य अभिनेत्याबाबत सस्पेन्स
या चित्रपटाला अजय-अतुल या लोकप्रिय जोडीने संगीत दिले आहे. मुख्य भूमिकेसाठी हजारो मुलाखतींमधून एका गुणी आणि नवीन चेहऱ्याची निवड करण्यात आली असून, मुख्य हिरोची ओळख अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. या नव्या कलाकारासोबतच जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, वैभव मांगले, छाया कदम आणि गार्गी कुलकर्णी हे मातब्बर अभिनेते महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चित्रपटगृहात धडकणार
ज्योती देशपांडे आणि गार्गी कुलकर्णी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, जिओ स्टुडिओज आणि आटपाट प्रॉडक्शन्सने याची प्रस्तुती केली आहे. नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन असलेला हा भव्य चित्रपट नवीन वर्षाच्या मुहुर्तावर, म्हणजेच 1 जानेवारी 2027 रोजी जगभरात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा सहज पार करेल, अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number