Bank Holiday List In January 2026: नवीन वर्ष 2026 चे स्वागत करण्यासाठी अवघे काही दिवस उरले असतानाच, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) वर्षाच्या पहिल्या महिन्यातील सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जानेवारी महिन्यात सण-उत्सव आणि राष्ट्रीय सुट्ट्यांमुळे विविध राज्यांमध्ये मिळून एकूण 16 दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या बँकेच्या व्यवहारांचे नियोजन आधीच करणे सोयीचे ठरेल.
राज्यानुसार सुट्ट्यांचे स्वरूप वेगळे
सर्व 16 दिवस देशभरातील बँका एकाच वेळी बंद राहणार नाहीत. काही सुट्ट्या विशिष्ट राज्यांतील स्थानिक सणांनुसार आहेत. मात्र, प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) आणि दुसरे व चौथे शनिवार तसेच रविवार या दिवशी संपूर्ण देशातील बँका बंद असतील. या व्यतिरिक्त दर महिन्याचे चार रविवार आणि दुसरा व चौथा शनिवार (10 आणि 24 जानेवारी) या दिवशीही बँका बंद राहतील.
जानेवारीमधील सुट्ट्यांची यादी
1 जानेवारी 2026: नवीन वर्षाचा दिवस / गान-नगाई (आयझॉल, चेन्नई, गंगटोक, इंफाळ, इटानगर, कोहिमा, कोलकाता, शिलाँग)
2 जानेवारी 2026: नवीन वर्षाचा उत्सव / मन्नम जयंती (आयझॉल, कोची, तिरुवनंतपुरम)
3 जानेवारी 2026: हजरत अली यांचा जन्मदिन (कानपूर, लखनौ)
12 जानेवारी 2026: स्वामी विवेकानंद जयंती (कोलकाता)
14 जानेवारी 2026: मकर संक्रांती / माघ बिहू (मुंबई, अहमदाबाद, भुवनेश्वर, गुवाहाटी, इटानगर)
15 जानेवारी 2026: उत्तरायण पुण्यकाळ / पोंगल / माघी संक्रांती (बेंगळुरू, चेन्नई, गंगटोक, हैदराबाद, विजयवाडा)
16 जानेवारी, 2026: तिरुवल्लुवर दिवस (चेन्नई)
17 जानेवारी 2026: उझावर थिरुनल (चेन्नई)
23 जानेवारी 2026: नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती / सरस्वती पूजा / बसंत पंचमी (अगरतळा, भुवनेश्वर, कोलकाता)
26 जानेवारी 2026: प्रजासत्ताक दिन (मुंबईसह संपूर्ण देशात बँका बंद असणार)
डिजिटल सेवा राहणार सुरू
दरम्यान, बँकेच्या शाखा बंद असल्या तरी ग्राहकांना घाबरण्याचे कारण नाही. सुट्ट्यांच्या कालावधीत UPI (PhonePe, Google Pay, इ.), नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग, ATM सेवा अखंडित सुरू राहतील.