UPI Security Update : आता UPI पिन टाकण्यापूर्वी बँक विचारणार ‘हा’ प्रश्न; सायबर फसवणूक रोखण्यासाठी बँकांचा RBI ला नवा प्रस्ताव

सध्या युपीआयवरून पैसे पाठवताना रक्कम टाकल्यानंतर लगेचच पिन (PIN) एंटर करण्याची स्क्रीन येते. घाईघाईत किंवा फसवणुकीला बळी पडलेले ग्राहक सहसा विचार न करता पिन टाकून बसतात.<br/>

UPI Security Update : आता UPI पिन टाकण्यापूर्वी बँक विचारणार ‘हा’ प्रश्न; सायबर फसवणूक रोखण्यासाठी बँकांचा RBI ला नवा प्रस्ताव

UPI security update : देशभरात युपीआयच्या (UPI) माध्यमातून होणारे व्यवहार जितके सोपे झाले आहेत, तितकेच सायबर भामट्यांकडून होणाऱ्या फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. या वाढत्या ऑनलाईन फ्रॉडला अटकाव घालण्यासाठी देशातील प्रमुख बँकांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. संशयास्पद किंवा हाय-रिस्क व्यवहारांच्या वेळी युझरला थेट युपीआय पिन (UPI PIN) टाकण्याऐवजी आधी स्क्रीनवर एक 'हो/नाही' (Yes/No) असा चेतावणीचा संदेश (Alert) दाखवण्याचा प्रस्ताव बँकांनी तयार केला आहे.

कसा काम करेल 'हो/नाही' चा स्पीड ब्रेकर?
सध्या युपीआयवरून पैसे पाठवताना रक्कम टाकल्यानंतर लगेचच पिन (PIN) एंटर करण्याची स्क्रीन येते. घाईघाईत किंवा फसवणुकीला बळी पडलेले ग्राहक सहसा विचार न करता पिन टाकून बसतात.

नव्या प्रस्तावानुसार, जर एखाद्या व्यवहारात जोखीम आढळली, तर सिस्टीम लगेचच पिन स्क्रीन रोखणार आहे. त्याऐवजी स्क्रीनवर "तुम्हाला खरोखरच या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत का?" असा मेसेज पॉप-अप होईल. 'हो' (Yes) वर क्लिक केल्यानंतरच पिन टाकण्याचा पर्याय उपलब्ध होईल. यामुळे ग्राहकांना क्षणभर थांबून पैसे मिळणाऱ्या व्यक्तीची माहिती पुन्हा तपासण्याची संधी मिळेल.

कोणती पेमेंट्स मानली जाणार 'हाय-रिस्क'?
प्रत्येक व्यवहारात हा मेसेज येणार नाही, जेणेकरून व्यवहाराचा वेग कायम राहील. बँका यासाठी 'एआय' (AI) आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करून खालील 5 परिस्थितींमध्ये अलर्ट पाठवतील:

मोठा अनपेक्षित व्यवहार: एरव्ही 500 ते 1000 रुपये पाठवणारा युझर अचानक 50 हजार रुपये ट्रान्सफर करत असल्यास.

अनोळखी खाते: संशयास्पद पार्श्वभूमी असलेल्या खात्यावर पहिल्यांदाच मोठी रक्कम पाठवल्यास.

असामान्य वेळ: मध्यरात्री किंवा पहाटेच्या वेळी अचानक होणारे मोठे पेमेंट.

लोकेशनमध्ये बदल: तुमच्या नेहमीच्या ठिकाणापेक्षा किंवा शहरापेक्षा अचानक वेगळ्या लोकेशनवरून कमांड आल्यास.

हेही वाचा – TRAI Bhashini AI: कॉल ड्रॉपच्या त्रासातून अखेर सुटका; ट्रायने लाँच केलं 'हे' खास हायटेक ॲप

सायबर गुन्हेगारांच्या युक्त्यांना बसणार पायबंद
आजकाल लॉटरीचे आमिष, स्क्रीन-शेअरिंग ॲप्स किंवा "पैसे मिळवण्यासाठी पिन टाका" अशा बनावट प्रकारांमुळे अनेक लोक कष्टाची कमाई गमावत आहेत. बँकांनी हा प्रस्ताव विचारार्थ 'नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया' (NPCI) आणि 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया' (RBI) कडे पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच गुगल पे, फोनपे, पेटीएम आणि सर्व बँकांच्या ॲप्सवर हे नवीन सुरक्षेचे वैशिष्ट्य लागू केले जाईल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number