Balika Samridhi Yojana : मुलीच्या जन्मापासून 10 वी पर्यंत सरकार देणार आर्थिक बळ; जाणून घ्या सविस्तर माहिती

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही ठराविक अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने ग्रामीण आणि शहरी भागातील दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबांनाच या योजनेचा फायदा घेता येतो.

Balika Samridhi Yojana : मुलीच्या जन्मापासून 10 वी पर्यंत सरकार देणार आर्थिक बळ; जाणून घ्या सविस्तर माहिती

Balika Samridhi Yojana : देशात मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. यात 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' मोहिमेचा भाग असलेली 'बालिका समृद्धी योजना' ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेची सुरुवात 1997 मध्ये करण्यात आली असून, मुलींच्या जन्माचे स्वागत करणे, त्यांचे आरोग्य सुधारणे आणि बालविवाहासारख्या प्रथांना आळा घालणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार या माध्यमातून थेट मदतीचा हात देते.

पात्रता आणि लाभार्थी निकष
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही ठराविक अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने ग्रामीण आणि शहरी भागातील दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबांनाच या योजनेचा फायदा घेता येतो. योजनेचे नियम खालीलप्रमाणे आहेत:
– एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलींनाच या योजनेचा लाभ घेता येतो.
– लाभार्थी मुलीची वय 18 वर्षांपेक्षा कमी असणे अनिवार्य आहे.
– मुलीचा जन्म दाखला आणि कुटुंबाचा दारिद्र्यरेषेखालील दाखला असणे आवश्यक आहे.

आर्थिक मदतीचे टप्पे आणि स्वरूप
योजनेचे स्वरूप अतिशय व्यापक असून मुलीचा जन्म झाल्यापासून ते तिच्या 10 वी पर्यंतच्या शिक्षणासाठी टप्प्याटप्प्याने आर्थिक रसद पुरवली जाते. मुलगी जन्माला आल्यावर मातेला प्रसूतीनंतर 500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. त्यानंतर, शालेय शिक्षणासाठी खालीलप्रमाणे वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते:
इयत्ता पहिली ते तिसरी: प्रतिवर्ष 300 रुपये.
इयत्ता चौथी: 500 रुपये.
इयत्ता पाचवी: 600 रुपये.
इयत्ता सहावी व सातवी: प्रतिवर्ष 700 रुपये.
इयत्ता आठवी: 800 रुपये.
इयत्ता नववी आणि दहावी: प्रतिवर्ष 1000 रुपये.

हेही वाचा – Udyogini Scheme : महिलांना 3 लाखांपर्यंतचे विनातारण कर्ज! जाणून घ्या उद्योगिनी योजनेविषयी

आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया
बालिका समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांना काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यामध्ये मुलीचा आधार कार्ड, जन्म दाखला, पालकांचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड यांचा समावेश होतो. यासोबतच निवासाचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो आणि बँक पासबुकचे तपशील असणे गरजेचे आहे. अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिस (BDO) किंवा महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता. तिथे अर्ज भरून आणि कागदपत्रे जोडून जमा केल्यानंतर पडताळणी होऊन लाभ मिळण्यास सुरुवात होते.

योजनेचे भविष्यातील फायदे
ही योजना केवळ आर्थिक मदत करत नाही, तर ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाबाबत जनजागृती करण्याचे मोठे काम करते. अनेकदा पैशांच्या अभावी मुलींचे शिक्षण 10 वीच्या आतच सोडवले जाते, अशा वेळी ही वार्षिक शिष्यवृत्ती पालकांसाठी मोठा आधार ठरते. मुलींना सुरक्षित भविष्य मिळावे आणि त्यांनी उच्च शिक्षणाकडे पाऊल टाकावे, यासाठी ही योजना पायाभरणी करण्याचे काम करत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे बालविवाहाचे प्रमाण कमी होण्यास आणि मुलींचा समाजात दर्जा उंचावण्यास मदत होत आहे.

हेही वाचा – Ration Card e-KYC : रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी; 31 डिसेंबरपर्यंत 'हे' काम न केल्यास होईल मोठे नुकसान

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number