Baba Vanga Prediction: जगभरात भविष्यवेत्त्यांचा उल्लेख झाला की सर्वप्रथम ज्या व्यक्तीचे नाव समोर येते ते म्हणजे बाबा वेंगा. त्यांच्या अनेक भाकितांनी पूर्वीच अचूक ठरल्याचा दावा त्यांच्या अनुयायांकडून सातत्याने केला जातो. 2026 संदर्भात त्यांनी केलेल्या अंदाजांवर पुन्हा चर्चा रंगू लागली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, येणारे वर्ष मानवजातीसाठी अनेक धोक्यांनी भरलेले ठरू शकते. दरम्यान, 1911 मध्ये बल्गेरियातील एका छोट्या गावात जन्मलेल्या बाबा वेंगा यांचे दुसऱ्या महायुद्धाबाबतचे भाकीत अचूक ठरल्याने त्यांना जागतिक ओळख मिळाली. हिटलरचा अंत, ब्रिटनच्या राणीचे निधन, अमेरिकेवरील हल्ला, जपानमधील त्सुनामी अशा घटनांचा उल्लेख त्यांनी आधीच केला होता, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. त्यामुळेच 2026 संबंधित त्यांच्या चेतावणीकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे.
हेही वाचा – Viral Story: असं काय झालं की अवघ्या काही तासांतच तरुणाने नोकरी सोडली? म्हणाला, ‘पहिल्या तीन तासांत…
2026 बाबत धक्कादायक भाकित?
बाबा वेंगा यांच्या अतीप्रसिद्ध भाकितांनुसार 2026 मध्ये जगभर नैसर्गिक आपत्तींचा उधाण येण्याची शक्यता आहे. पृथ्वीच्या 11 ते 12 टक्के भूभागावर भूकंप, ज्वालामुखी उद्रेक आणि विनाशकारी पुरांचा तडाखा बसेल, अशी भाकितं त्यांनी व्यक्त केलेली आहेत. या घटनांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि आर्थिक नुकसान होऊ शकते.
याशिवाय, त्यांच्या म्हणण्यानुसार, जग राजकीयदृष्ट्याही अस्थिरतेच्या गर्तेत सापडेल. अमेरिका आणि रशियामधील संघर्ष तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी ठरू शकतो, असा इशारा त्यांनी दिल्याचा दावा केला जातो. अगदी पृथ्वीवर एलियनचा संभाव्य हस्तक्षेप होईल, अशीही काल्पनिक पण गाजलेली भाकीतं त्यांच्या नावावर आहेत. बाबा वेंगा यांनी 2026 मध्ये चीन मोठ्या महासत्तेच्या रूपाने अमेरिकेला मागे टाकेल, असा अंदाजही व्यक्त केला आहे. या सर्व दाव्यांमुळे अनेक जणांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की, येणारे वर्ष खरंच इतकं अस्थिर असेल का?